न्यूयॉर्क : गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली अपेक्षित घोडदौड कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अल्कराझने दुसऱ्या फेरीत लॉईड हॅरिसचे आव्हान ६-३, ६-१, ७-६ (७-४) असे सहज मोडून काढले.

अल्कराझच्या गटातून बहुतेक मानांकित खेळाडू आपले आव्हान राखून आहेत. त्याचवेळी दुसऱ्या गटातून नोव्हाक जोकोविचचा मार्ग अधिक सुकर होत आहे. जोकोविचचा समावेश असलेल्या गटातून चौथा मानांकित होल्गर रुन, पाचवा मानांकित कॅस्पर रुड, सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अल्कराझच्या गटातून तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, सहावा मानांकित यान्निक सिन्नेर, आठवा मानांकित आंद्रे रुब्लेव आणि १२वा मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव हे आघाडीचे खेळाडू स्पर्धेत कायम आहेत.  

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?

हेही वाचा >>> Asia Cup 2023 : भारताच्या आघाडीच्या फळीचा कस! आशिया चषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना आज

माजी विजेत्या मेदवेदेवने ख्रिस्तोफर ओकेनेलला ६-२, ६-२, ६-७ (६-८), ६-२ असे, रुब्लेवने गेल मोंफिसला ६-४, ६-३, ३-६, ६-१ असे, तर कॅमरुन नॉरीने यू सु याला ७-५, ६-४, ६-४ असे पराभूत केले.

महिला एकेरीतून तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुला आणि पाचव्या मानांकित ओन्स जाबेऊरने आगेकूच कायम राखली. दुसऱ्या फेरीत पेगुलाने पॅट्रिसिया मारिया टिगचे आव्हान ६-३, ६-१ असे सहज परतवून लावले. त्याचवेळी जाबेऊरला मात्र लिंडा नोस्कोवाचा प्रतिकार सहन करावा लागला. जाबेऊरने ७-६ (९-७), ४-६, ६-३ असा विजय मिळवला.

इस्नेरचा भावपूर्ण निरोप

अमेरिकन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अमेरिकेच्या जॉन इस्नेरने व्यावसायिक टेनिसमधून चाहत्यांचा भावपूर्ण निरोप घेतला. आठवडय़ापूर्वीच इस्नेरने ही आपली अखेरची स्पर्धा असेल असे सांगितले होते. दुसऱ्याच फेरीत अमेरिकेच्याच मायकल ममोहकडून पाच सेटच्या मॅरेथॉन लढतीनंतर इस्नेरला ३-६, ४-६, ७-६ (७-३), ६-४, ७-६ (१०-७) असा पराभवाचा सामना करावा लागला. लढतीनंतर कोर्टवरच चाहत्यांशी संवाद साधताना इस्नेर अत्यंत भावूक झाला होता.

Story img Loader