एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भगवान विष्णूच्या वेशात ‘पोझ’ देऊन एका हातात बूट धरल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जयकुमार हिरेमठ या सामाजिक कार्यकर्त्यांने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. त्यानुसार देवी-देवतांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अंतर्गत धोनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार आहे.

Story img Loader