Ravi Shastri Warns Australian Team: माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणात काटा असल्याचे सांगत हाय-प्रोफाइल बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या आधी फलंदाजी आयकॉन विराट कोहलीचे समर्थन केले.  ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या आवृत्तीत स्वत: ला सिद्ध करण्याच्या दृष्टीने कोहली कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म पुन्हा शोधण्याची आशा करेल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये फलंदाजी करणारा कोहली स्वत:मध्ये सुधारणा करण्यास उत्सुक असेल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाच्या फलंदाजीबद्दल बोलताना, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजी आक्रमणाला कडक इशारा दिला आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “पाकिस्तानच काय दुबईपण नाही खेळणार…” भारताचा स्टार फिरकीपटूचे जावेद मियाँदादला चोख प्रत्युत्तर

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या संवादादरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री म्हणतात, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या (कोहलीच्या) विक्रमामुळे त्याला आत्मविश्वास मिळेल. तो पूर्ण क्षमतेने खेळण्याचा प्रयत्न करेल आणि यासाठी त्याला चांगली सुरुवात करायची आहे. तुम्ही त्याच्या पहिल्या दोन डावांकडे लक्ष द्या. जर त्याने चांगली सुरुवात केली तर तो ऑस्ट्रेलियन संघाच्या मार्गातील काटा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हे घडू नये म्हणून नक्कीच प्रार्थना करतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची सरासरी फक्त ५० पेक्षा कमी आहे. त्याचे आश्चर्यकारक विक्रमच त्याला पुढे घेऊन जातील.”

३४ वर्षीय खेळाडूने सप्टेंबर २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली आहेत. परंतु, कोहलीला २०१९ पासून कसोटी शतकाची नोंद करण्यात अपयश आले आहे. रन मशीन कोहलीने भारतासाठी १०४ कसोटी सामने खेळले आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने आपल्या ऐतिहासिक कसोटी कारकिर्दीत ८,११९ धावा केल्या आहेत. या फलंदाजाने रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी २७ शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा: On This Day: जेव्हा पाकिस्तानची होते पळताभुई थोडी…; जंबोच्या तुफान पराक्रमाची गाथा सांगणारा video खुद्द BCCIने च केला शेअर

४८.०६ च्या सरासरीने, माजी भारतीय कर्णधार कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १६८२ धावा केल्या आहेत. कोहली स्टारर टीम इंडिया गुरुवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

Story img Loader