आकाश चावलाच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीमुळे न्यू हिंदने गतउपविजेत्या दिलीप वेंगसरकर फाउन्डेशन संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक मारली. चावलाने नाबाद १४१ धावा फटकावल्या तर तनुष कोटियनने नाबाद ४७ धावा आणि सहा बळी मिळवत न्यू हिंदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हिंदू जिमखाना संघानेही गतविजेत्या रिझवीचा पराभव करून आगेकूच केली. आता हिंदू जिमखाना वि. बोहरा क्रिकेट क्लब आणि पोलिस जिमखाना वि. न्यू हिंद अशा उपांत्य फेरीच्या लढती रंगतील.

Story img Loader