India vs Malaysia Hockey Asian Champions Trophy Final 2023: भारतीय हॉकी संघाने चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये भारत एका टप्प्यावर ३-१ ने पिछाडीवर होता, त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या क्वार्टरमधील चौथा गोल करत भारतीय संघाने हा सामना ४-३ असा जिंकला आणि चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.

यापूर्वी भारताने २०११, २०१६ आणि २०१८ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते, कारण अंतिम सामना रद्द झाला होता. टीम इंडिया पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. भारतीय हॉकी संघाला आता हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. अशा स्थितीत या विजयाने भारतीय खेळाडूंचे मनोबल नक्कीच उंचावले असावे.

Why is Afganistan Playing Home Matches in India
AFG vs NZ: अफगाणिस्तानचा संघ घरच्या मैदानावरील सामने भारतात का खेळतो? न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका नोएडामध्ये होणार
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Harvinder Singh First Gold Medal in Archery for India Dharambir Wins Gold and Pranav Surma Got Silver in Club Throw
Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी
Paris Paralympics 2024 Rubina Francis won bronze medal
Paris Paralympics 2024 : रुबिना फ्रान्सिसने नेमबाजीत जिंकले कांस्यपदक, भारताला तिसऱ्या दिवशी मिळाले पाचवे पदक
Paris Paralympics Games 2024 Manish Narwal Won Silver News in Marathi
Manish Narwal Won Silver: पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा मनिष नरवाल आहे तरी कोण? भारताने लागोपाठ जिंकली ४ पदकं
Paris Paralympics Games 2024: पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराला सुवर्ण; मोना अगरवालला कांस्य
West Indies Beat South Africa by 30 Runs in 2nd T20I Match
WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…
South Africa beat West Indies by 40 runs
WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, डब्ल्यूटीसीमध्ये झाला बदल, भारत कितव्या स्थानी?

हाफ टाइमपर्यंत भारताचा खेळ चांगला झाला नाही

मध्यंतरापर्यंत मलेशियाचा संघ ३-१ ने आघाडीवर होता. मुख्य गोष्ट म्हणजे टीम इंडियाने सामन्यातील पहिला गोल केला. जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर भारतीय संघ रुळावरून घसरला आणि मलेशियाने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. १४ व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या मैदानी गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये १८ व्या मिनिटाला राहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि २८ व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिक करून आपल्या संघाला भारताविरुद्ध ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने काही सोपे पेनल्टी कॉर्नरही गमावले.

हेही वाचा: IND vs WI 4th T20: टीम इंडिया ‘यशस्वी’ भव! जैस्वाल- शुबमनच्या खेळीने वेस्ट इंडीज भुईसपाट, मालिकेत २-२ बरोबरी

तिसऱ्या-चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाचे पुनरागमन

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन केले. भारतीय संघाने एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. हाफ टाईमनंतरही भारताने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला भारताच्या काउंटर अॅटॅकवर मलेशियाला त्याच्या बॉक्समध्ये फाऊल करण्यात आले. यावर रेफ्रींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर ३-२  असा केला. त्याच मिनिटाला (४५ व्या मिनिटाला) गुरजंत सिंगने काउंटर अ‍ॅटॅकवर मैदानी गोल करत स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. चौथ्या क्वार्टरच्या ५६व्या मिनिटाला भारतीय संघाने चौथा गोल केला. आकाशदीप सिंगने प्रतिआक्रमण करत उत्कृष्ट मैदानी गोल केला आणि त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन ठरली.