सोमदेव देववर्मनच्या नेतृत्वाखालील बलाढय़ भारतीय संघाला इंडोनेशियाकडून फारसा प्रतिकार होणार नसला तरी डेव्हिस चषकाच्या आशिया-ओशियाना गट-१ मध्ये स्थान कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील डेव्हिस चषकातील लढतीला शुक्रवारपासून बंगळुरूमध्ये सुरुवात होत आहे.
या मोसमाच्या सुरुवातीला दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या लढतीत भारताला गटातील आपले स्थान अबाधित राखण्याची संधी होती. पण संघातील खेळाडूंच्या बंडाचा फटका भारताला बसला. त्यामुळे भारताला दक्षिण कोरियाकडून १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला. पण बंडाचे निशाण उगारणारे सोमदेवसह युकी भांब्री आणि सनम सिंग हे खेळाडू भारतीय संघात परतले आहेत. त्यामुळे भारताला दुबळ्या इंडोनेशिया संघाचा पाडाव करताना फारसे प्रयास पडणार नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in