Virat Kohli comparison of Babar Azam: सध्या जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची तुलना बाबर आझमशी केली जाते आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू या दोघांबद्दल आपापले मत मांडत आहेत. या दोघांबद्दल बोलत असताना श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासनेही आपले मत व्यक्त केले आणि सांगितले की, “बाबर आझम हा सध्या जगातील नंबर वन फलंदाज आहे, तर विराट कोहलीही भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी आणखी चांगली कामगिरी करेल आणि त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे.” त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या तुलनेबद्दलही मोठे विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीसाठी वय हा फक्त एक आकडा आहे- चमिंडा वास

श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वासने एका मुलाखतीत बाबर आझम, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या तुलनेबद्दल भाष्य केले आहे. वासने बाबरचे वर्णन सध्या जगातील नंबर वन फलंदाज म्हणून केले आहे, तर तो तेंडुलकर आणि कोहली यांच्यातील विक्रमांच्या तुलनेवरही बोलला आहे.

हेही वाचा: Ishan Kishan: इशान किशनने आकाश चोप्राची केली बोलती बंद, लाइव्ह मॅचमध्ये असा काही म्हटला की…; पाहा Video

चमिंडा वासने हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. “सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकतो का?” असे विचारले असता त्याने उत्तर दिले की, “विक्रम हे मोडण्यासाठीच बनतात. वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी अनेक विक्रम मोडले आहेत. विराट कोहलीची खास गोष्ट म्हणजे तो अजूनही तरुण दिसतो आणि वय त्याच्यासाठी फक्त एक आकडा आहे. सध्या कोहली ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून तो खूप काही साध्य करेल. कोहलीने नुकताच आपला ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि या सामन्यात त्याने आपले ७६वे शतकही झळकावले. तो भारतासाठी अजून खूप वर्षे खेळेल.”

बाबर आझम नंबर वन फलंदाज आहे

बाबर आझमबद्दल बोलताना चमिंडा वास म्हणाला की, “बाबर आझम हा जगातील नंबर वन फलंदाज आहे. तो ज्या प्रकारे कामगिरी करतो आणि संघासाठी योगदान देतो ते प्रभावित करणारे आहे. हे सर्व आपल्या सर्वांना माहित आहे. युवा क्रिकेटपटूंनी त्याच्याकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे. त्याला लंका प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी पाहताना मी खूप उत्सुक आहे. बाबर व्यतिरिक्त नसीम शाह देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि नसीमची पाथीरानासोबत जोडी करणे या दोघांसाठी खास असेल.” बाबर आझम सध्या श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्स संघाकडून खेळत आहे.

हेही वाचा: Archery WC: जगात भारी महाराष्ट्रीयन नारी! सातारच्या लेकीने एकाच हंगामात दोन विजेतेपद जिंकत रचला इतिहास

याशिवाय यंदाच्या आशिया कपमध्ये कोणता संघ विजयाचा दावेदार आहे? हेही चामिंडा वासने सांगितले. माजी क्रिकेटपटू म्हणाला, “हे एक वेगळे स्वरूप आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत ५० षटकांचे क्रिकेट अनेक आव्हाने निर्माण करते. श्रीलंका आशिया कप विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे, भारत आणि श्रीलंकेने अनेक आशिया कप जिंकले आहेत, पाकिस्तानने काही जिंकले आहेत आणि तेही दावेदार आहेत.. जर तुम्ही ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आलात तर सर्व संघ समान आहेत. जर तुमच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजी संतुलित असेल तर तुम्ही कधीही सामना फिरवू शकता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaminda vaas told babar azam the worlds number one batsman said a big thing about virat kohlis age avw
Show comments