प्लाझान  : फेरान टॉरेसच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलानने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये व्हिक्टोरिया प्लाझान  संघावर ४-२ अशा फरकाने विजय मिळवला. बार्सिलोनाने आक्रमक सुरुवात केली. सहाव्याच मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर टॉरेसने (४४व्या मि.) गोल करत संघाला मध्यांतरापर्यंत २-० अशा स्थितीत पोहोचवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसऱ्या सत्रात प्लाझानच्या टॉमस चॉरीने गोल करत आघाडी २-१ अशी कमी केली. टॉरेसने (५४व्या मि.) यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाला आघाडी ३-१ अशी केली. चॉरीने (६३व्या मि.) पुन्हा एकदा गोल करत आघाडी ३-२ अशी कमी केली. सामन्याच्या ७५व्या मिनिटाला पाब्लो टोरेने प्लाझानच्या बचावफळीला भेदत आघाडी ४-२ अशी भक्कम केली. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.

अन्य सामन्यात,  मोहम्मद सलाह आणि डार्विन न्युनेजने झळकावलेल्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने नापोलीवर २-० असा विजय मिळवला.