आर्सेनल क्लबला रविवारी क्रिस्टल पॅलेसविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांनी मोठ बांधली आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत गुरुवारी वेस्ट ब्रॉमवीच अॅल्बियोनविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडूंना पुन्हा नव्या जोमाने मैदानावर उतरवण्यासाठी वेंगर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पराभवामुळे आर्सेनल क्लबच्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या पात्रता मिळवण्याच्या प्रयत्नांना हादरा बसला.
गुणतालिकेतील अव्वल चार क्लब चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरणार आहेत. या बरोबरीनंतरही आर्सेनल ईपीएल गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम असले तरी मँचेस्टर युनायटेड चार गुणांच्या फरकाने पाचव्या स्थानावर आहे. ‘चॅम्पियन्स लीगचे स्वप्न पाहण्याच्या मन:स्थितीत मी नाही, परंतु खेळाडूंना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याची गरज आहे आणि वेस्ट ब्रॉमविरुद्धच्या लढतीपूर्वी हे ध्येय गाठायचे आहे,’ असे वेंगर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा