मिनी विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स कंरडक स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होतेय. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीच्या यादीत पहिल्या आठमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेले संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आठ संघाची दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’ गट- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांग्लादेश.  ‘ब’ गट- भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका. चॅम्पियन्स कंरंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी प्रत्येकी एक सामना खेळेल. त्याप्रमाणे प्रत्येक साखळी सामन्यात प्रत्येक संघ तीन सामने खेळताना दिसेल. साखळी सामन्यात प्रत्येक विजयी संघाला दोन गुण दिले जातील. यातील अव्वल स्थानावरील दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साखळी सामन्यात प्रत्येक सामन्यात विजयी संघाला दोन गुण दिले जातील. पण, सामना टाय झाला किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सामना रद्द झाला तर दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. त्यावरुन बाद फेरीतील चार संघाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. बाद फेरीत ‘अ’ गटातील अव्वल संघ ‘ब’ गटातील दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाशी सामना खेळेल. तर या उलट तर ‘ब’ गटातील अव्वल संघ ‘अ’ गटातील दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाशी चारहात करेल. यात विजयी मिळवणाऱ्या दोन संघांना अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल.

उपांत्य फेरीतील सामन्यासाठी टाय झालेल्या सामन्याचा निकालासाठी सुपर ओव्हर्सचा वापर करण्यात येणार आहे. तसेच अंतिम सामन्यात कोणत्याही कारणामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर संयुक्तरित्या विजेतपद दिले जाईल. या आठ संघातील कोणता संघ चॅम्पियन ठरेल, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. २०१३ मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गतवर्षीची पुनरावृत्ती करेल का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे.