Dinesh Karthik statement on Team India Champions Trophy 2025 Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. रोहित ब्रिगेडने आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी, माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संघातील पाच फिरकीपटूंना स्थान देण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने शेवटच्या क्षणी काही बदल केले, जखमी बुमराहच्या जागी तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान दिले. सलामीवीर यशस्वी जैस्वालला वगळल्यानंतर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली. चक्रवर्ती हा भारतीय संघातील पाचवा फिरकीपटू आहे. भारत पाच फिरकी गोलंदाजी पर्यायांसह स्पर्धेत उतरणार आहे याबद्दल कार्तिक फारसा खूश नाही. कार्तिकला वाटते की बुमराहची जागा घेण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा आदर्श खेळाडू ठरला असता.

दिनेश कार्तिक जसप्रीत बुमराहबद्दल काय म्हणाला?

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “बघा, जर तुम्हाला अनुभवावर भर द्यायचा असता तर सिराज हा एक आदर्श पर्याय असू शकला असता. मात्र, हर्षितने इंग्लंडविरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे भारतीय संघ हर्षित राणाच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला आहे. मला वाटते की, टीम इंडिया सध्या सिराजपेक्षा त्याच्या समर्थनात आहे.”

भारताचे सर्व सामने दुबईत –

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करणारा वरिष्ठ फिरकीपटू अष्टपैलू रवींद्र जडेजा याचा अंतिम अकरा जणांमध्ये समावेश होणे जवळजवळ निश्चित आहे. दुबईच्या परिस्थितीत, कुलदीप यादव गोलंदाजीमध्ये भारतासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो. फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल फलंदाजीमध्ये उपयुक्त ठरला आहे आणि त्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. कार्तिक म्हणाला की, संघात पाच फिरकीपटूंची उपस्थिती दर्शवते की संघ व्यवस्थापन आदर्श संघ संयोजनाबद्दल अनिश्चित आहे.

पाच फिरकीपटू खूप जास्त –

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “मला वैयक्तिकरित्या वाटते की पाच फिरकीपटू खूप जास्त आहेत. मला वाटतं की चार पुरेसे होते. त्यामुळे तिथेच थोडासा गोंधळ झाल्याचे दिसून येते. कदाचित हा एक कठोर शब्द आहे. परंतु, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहित नाही. कारण त्यांनी अगोदर संघ जाहीर केला आणि नंतर सलामीवीराच्या जागी दुसऱ्या फिरकी गोलंदाजाचा समावेश केला.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर.