Champions Trophy 2025 Updates: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ येत्या १९ फेब्रुवारीपासून हायब्रिड मॉडेलमध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. यासाठी आयसीसीने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दरम्यान, इंग्लंड संघाच्या अडचणी वाढू शकतात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तान संघावर बहिष्कार टाकावा असे सांगितले जात आहे. यूकेच्या १६० हून अधिक राजकारण्यांनी एका पत्रावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार इंग्लंडने पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणारा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना खेळण्यास नकार द्यावा.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) तालिबान राजवटीद्वारे महिलांच्या हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध भूमिका घ्यावी अशी राजकारण्यांची इच्छा आहे. २६ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यावर त्यांनी बहिष्कार टाकावा, असे राजकारण्यांचे म्हणणे आहे.

Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sam Konstas Admits Provoking Jasprit Bumrah in Sydney Test which Leads to Usman Khwaja Wicket Said My Fault
Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
India Slip To Third Position in ICC test Team Rankings After Defeat in Australia Test and South Africa Whitewashed Pakistan
ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral

हेही वाचा – ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांचा खेळातील सहभाग प्रभावीपणे कमी केला आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांचे उल्लंघन करण्यास भाग पाडले. दरम्यान ब्रिटीश संसदेतून एक कडक शब्दात पत्र समोर आले आहे. ज्यात ECB ला आपला नैतिक आक्षेप नोंदवण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा – VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…

लेबर खासदार टोनिया अँटोनियाझी यांनी लिहिलेल्या या पत्रावर हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या क्रॉस-पार्टी गटाने स्वाक्षरी केली आहे, ज्यात निगेल फॅरेज आणि जेरेमी कॉर्बिन यांचा समावेश आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गॉड यांना या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही इंग्लंडच्या पुरुष संघाच्या खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात महिला आणि मुलींबरोबर होणाऱ्या वाईट वागणुकीविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करतो.”

हेही वाचा – “पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं

पत्रात पुढे म्हटलं आहे की, “आम्ही ईसीबीला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करण्याची विनंती करत आहोत, कारण असे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही हे स्पष्ट संकेत देण्यासाठी हा निर्णय घ्यावा. आपण लिंगभेदाविरुद्ध उभे राहिले पाहिजे. आम्ही ईसीबीला एकतेचा संदेश देण्याची विनंती करतो, जेणेकरून अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींना कळवता येईल की त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात नाही.”

पण स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या पत्राला उत्तर दिले आहे. ज्यात म्हटलं आहे की, इंग्लंड क्रिकेट बोर्ड तालिबानच्या राजवटीत असलेल्या अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींना दिलेल्या वागणुकीचा निषेध करते. पण एकट्याने निषेध नोंदवण्यापेक्षा सर्व सदस्य राष्ट्रांकडून एकसमान दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे.

Story img Loader