Gautam Gambhir and Ajit Agarkar fight for Indian squad Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. त्यांचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. कागदावर हा संघ खूप मजबूत दिसत आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रोहित शर्मा कर्णधार म्हणून आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो. इंग्लंडविरुद्ध सलग तीन एकदिवसीय सामने जिंकून टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, संघ निवडीबाबत एक खळबळजनक खुलासा झाला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघ निवडीशी संबंधित अनेक निर्णयांवर एकमत नव्हते. निवड बैठकीत दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद झाला. काही खेळाडूंच्या निवडीबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. श्रेयस अय्यरच्या आगमनाने मधल्या फळी अधिक मजबूत झाली आहे, परंतु गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितले आहे की तो डाव्या-उजव्या संयोजनासाठी मधल्या फळीत सतत बदल करू शकतो. अशा परिस्थितीत संघात कोणाचाही फलंदाजीचा क्रम निश्चित असणार नाही.

श्रेयस अय्यरबाबत वादविवाद –

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अय्यर मधल्या फळीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. डाव्या-उजव्या टॉप-ऑर्डर लाइन-अपसह प्रयोग करण्यासाठी भारताने त्याला पहिल्या सामन्यात वगळण्याचा विचार केला असला तरी, त्याने दोन अर्धशतके झळकावत ६०.३३ च्या सरासरीने १८१ धावा केल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या बैठकीत अय्यरला संघात कायम ठेवण्याबाबत बरीच चर्चा झाली.

ऋषभ पंत विरुद्ध केएल राहुल –

या अहवालात पुढे असे दिसून आले आहे की गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ व्यवस्थापनाने केएल राहुलला पाठिंबा देऊन अजित आगरकरच्याविरुद्ध भूमिका घेतली. गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पत्रकार परिषदेत आगरकरने आयसीसी स्पर्धा आणि इंग्लंड वनडे मालिकेसाठी पंतची पहिली पसंती असलेला यष्टीरक्षक म्हणून पुष्टी केली होती. पण रोहित आणि गंभीर दोघांनीही सातत्य राखण्याचे आवाहन केले. कारण राहुल इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये खेळला होता.

अहवालात काय समोर आले?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करताना पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असल्याचा दावा केला होता. त्याच वेळी, पंत हा संघातील एकमेव खेळाडू आहे, ज्याला इंग्लंड मालिकेतील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. श्रेयस अय्यरला संघात कायम ठेवण्याबाबत आणि दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानावरून निवड बैठकीत जोरदार वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती – गौतम गंभीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत रवाना होण्यापूर्वीच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत गंभीरने पंतच्या जागी राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिला पसंतीचा यष्टीरक्षक असल्याचे पुष्टी केली होती. तो म्हणाला होता, “व्यक्तिगतपणे बोलणे खूप कठीण आहे, पण मी एवढेच म्हणू शकतो की जर पंत संघाचा भाग असेल तर त्याला संधी मिळेल. सध्या केएल आमचा नंबर वन यष्टिरक्षक आहे. त्याने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा तुमच्या संघात दोन यष्टिरक्षक असतात, तेव्हा तुम्ही दोघांनाही त्या गुणवत्तेने खेळवू शकत नाही. आशा आहे की पंतला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो त्यासाठी तयार असेल.”