Champions Trophy 2025 PCB Threat to India: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. यासाठी पाकिस्तानने वेळापत्रकाचा मसुदाही आयसीसीकडे सादर केला आहे. या मसुदानुसार भारताचे सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पण एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही. हायब्रिड मॉडेलद्वारे भारताचे सामने खेळवले जावे, अशी चर्चा बीसीसीआय आयसीसीबरोबर करणार आहे. पण याच दरम्यान आता पीसीबीने भारताला धमकी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यास भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी पीसीबीने दिली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पीसीबी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यावर ठाम आहे आणि १९-२२ जुलै दरम्यान कोलंबोमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेदरम्यान कोणत्याही संकरित मॉडेलच्या प्रस्तावाला विरोध करेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय माध्यमांच्या वृत्ताला उत्तर देताना पीसीबीने ही ठाम भूमिका घेतली आहे. राजकीय संबंध आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे, २००८ च्या आशिया चषकापासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

हेही वाचा – Copa America: फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत, डगआऊटमधील रडतानाचा VIDEO व्हायरल

बीसीसीआयने आयसीसीला Champions Trophy 2025 साठी हायब्रिड मॉडेल लागू करण्याची विनंती करण्याचे संकेत दिले आहेत, जेणेकरून भारत आपले सामने तटस्थ देशात खेळू शकेल. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध राजकीय आणि सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे तणावपूर्ण झाले आहेत. त्यानंतर भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकाही स्थगित करण्यात आली होती. २००८ मध्ये आशिया कपसाठी भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा किंवा तटस्थ ठिकाणी आयोजित आशिया कप स्पर्धेत आमनेसामने येतात.

हेही वाचा – Anant Radhika Wedding: गौतम गंभीर-किंग खानचा अंबानींच्या लग्नात ‘ब्रोमान्स’, एकमेकांना पाहताच… VIDEO व्हायरल

आशिया चषक २०२४ दरम्यान अशीच अडचण निर्माण झाली होती, जिथे बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यामुळे हायब्रिड मॉडेलद्वारे भारताचे सामने खेळवले गेले. पण या निर्णयामुळे पाकिस्तानने उपांत्य आणि अंतिम सामन्यांचे यजमानपद गमावले. यामुळेच Champions Trophy 2025 संपूर्णपणे पाकिस्तानमध्येच व्हावी या निर्णयावर पीसीबी अटळ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy 2025 if india refuse to travel pakistan will pull out of the 2026 t20 world cup said pcb as per reports bdg