Champions Trophy 2025 PCB could lose millions of dollars : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. बीसीसीआय पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी आपला संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. अनिश्चिततेमुळे सामन्याचे कोणतेही वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशात खेळवली गेली, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किती कोटींचा तोटा सहन करावा लागेल? जाणून घेऊया.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पीसीबीची आर्थिक स्थिती बिकट होणार आहे. १९९६ मध्ये एकदिवसीय विश्वचषक सह यजमानपद भूषवल्यानंतर पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारत सरकारचा सल्ला घेऊन बीसीसीआयने आपला निर्णय घेतला आहे, मात्र, पाकिस्तान तो मानायला तयार नाही. आयसीसीने जेव्हा हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले, तेव्हा पीसीबीने हे करण्यासही नकार दिला. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप लेखी काहीही दिलेले नाही.

Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
maharashtra assembly election quiz
Election Quiz: शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापनी केली?

पीसीबीचे किती नुकसान होईल?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, स्पर्धा पुढे ढकलल्यास किंवा दुसऱ्या देशात हलवल्यास पीसीबीला आयसीसीच्या निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये आयसीसीच्या निधीतील कपातीचाही समावेश आहे. अहवालात म्हटले आहे की, स्पर्धा हलवणे किंवा पुढे ढकलणे म्हणजे पीसीबीला US $ ६५ दशलक्ष (सुमारे ५४८ कोटी रुपये) चे नुकसान होऊ शकते. पीसीबीसाठी हा मोठा धक्का असेल कारण क्रिकेट बोर्डाने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियमच्या नूतनीकरणावर आधीच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. यामध्ये खर्च झालेल्या पैशांचा भार पीसीबीला सहन करावा लागू शकतो. आर्थिक दृष्ट्या त्यांची स्थिती आधीच बिकट आहे आणि याचा भारही त्यांना सहन करावा लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल.

हेही वाचा – Deepak Chahar : ‘जर CSK ने खरेदी केले नाही, तर ‘या’ संघाने माझ्यासाठी बोली लावावी…’, IPL 2025 पूर्वी दीपक चहरचे मोठे वक्तव्य

आयसीसीला आणि पीसीबीला बीसीसीआयसमोर का झुकावे लागते?

आयसीसी कमाईसाठी टीम इंडियावर खूप अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत, अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की आयसीसीच्या एकूण महसुलात बीसीसीआयचा वाटा सुमारे ८०% आहे. तसेच २०२४ ते २०२७ या चार वर्षांच्या करारासाठी आयसीसीने स्टार स्पोर्ट्सकडून $3 अब्ज मीडिया अधिकार विकले आहेत, ते देखील टीम इंडियाच्या लोकप्रियतेवर आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचे महत्त्व यावर आधारित आहेत.