PCB Demands Written Proof From BCCI: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात हे सामने खेळायला जाणार नसल्याचे वृत्त समोर येताच PCB ने मोठी अट घातली आहे. भारताने सुरक्षिततेचे कारण सांगत पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यास, भारत सरकारने परवानगी नाकारल्याचे बीसीसीआयला कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील, असे पीसीबीचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Champions Trophy 2025: ‘भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तर…’, PCB ने BCCIला दिली धमकी?

१९ जुलैला श्रीलंकेतील कोलंबो येथे आयसीसीची वार्षिक सभा होणार आहे. या सभेत पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुचवलेल्या हायब्रिड मॉडेलवर नकार देत सामने पाकिस्तानात खेळवले जावेत, यावर पीसीबी ठाम असणार आहे. पीसीबीच्या काही सूत्रांनी याबाबत माहिती देताना मोठे वक्तव्य केले आहे.

Champions Trophy 2025: पाकिस्तानची भारतासमोर मोठी अट

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजन समितीशी जवळून काम करणाऱ्या PCBच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “जर भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी नाकारली, तर ती लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे आणि बीसीसीआयने आयसीसीला तसे पत्र देणे बंधनकारक असेल. बीसीसीआयने आयसीसीला त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दौऱ्याच्या योजनांबद्दल टूर्नामेंटच्या किमान ५-६ महिने आधी आणि लेखी स्वरूपात आयसीसीला कळवायला हवं यासाठी आम्ही आग्रही आहोत.” असेही पीसीबीच्या सूत्राने सांगितले.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

२०२३ साली झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही, भारताचे सामने हायब्रिड मॉडेलप्रमाणे श्रीलंकेत झाले होते. BCCI ने सातत्याने सांगितले आहे की पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी संघ जाणार की नाही हा केवळ सरकाराचा निर्णय असेल.

लाहोरमध्ये संभाव्य सेमीफायनल आणि फायनल होणार असल्याने, पीसीबीने आधीच आयसीसीला त्यांचे ड्राफ्ट वेळापत्रक पाठवले आहे, ज्यामध्ये भारताच्या सर्व सामन्यांचा समावेश आहे आणि भारताचे सर्व सामने हे लाहोरमध्येच खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १ मार्च रोजी होईल, असे पीसीबीने दिलेल्या वेळापत्रकाच्या मसुदामध्ये आहे. Champions Trophy 2025 १९ फेब्रुवारीला कराचीमध्ये सुरू होईल आणि ९ मार्च रोजी लाहोरमध्ये अंतिम फेरी खेळवली जाईल. खराब हवामानाच्या प्रसंगी, १० मार्च हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. रावळपिंडीतही दोन सामने होणार आहेत.

हेही वाचा – VIDEO: युवराज-हरभजन-रैनाने उडवली विक्की कौशलच्या ‘Tauba Tauba’ गाण्याची खिल्ली, भारतीय क्रिकेटर्सचा भयंकर डान्स पाहिला का?

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनतरी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे चित्र आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीने गरज पडल्यास अतिरिक्त निधी बाजूला ठेवला आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने जर पाकिस्तानबाहेर खेळवावे लागले तर त्यासाठी आयसीसीने तयारी करून ठेवली आहे. “पाकिस्तानबाहेर काही सामने खेळण्याची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यकता असेल तर आयसीसी व्यवस्थापन अतिरिक्त खर्चाची शिफारस करत आहे,” असेही सूत्राने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy 2025 pcb demands bcci to give written proof of indian government denial of permission to play in pakistan as per sources bdg
Show comments