Champions Trophy 2025 Mohammed Siraj Drop in Team India : बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यी संघ जाहीर केला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद संघाला या संघातून डच्चू देण्यात आला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती आणि त्यातही सिराजचे नाव नव्हते. मोहम्मद सिराज भारतीय संघातून पत्ता का कट करण्यात आला आहे? जाणून घेऊया.

भारतीय भूमीवर २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सिराज टीम इंडियाचा भाग होता. याशिवाय जून २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही सिराज टीम इंडियाचा भाग होता, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आला नसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यावर आता कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मान मोहम्मद सिराजबाबत म्हणाला की ,”बुमराह खेळेल की नाही याबद्दल आम्हाला खात्री नव्हती. त्यामुळे, आम्हाला वाटले की आम्हाला नवीन चेंडूने आणि बॅकएंडवर गोलंदाजी करू शकेल अशा व्यक्तीची गरज आहे. म्हणून आम्ही बॅकएंडवर गोलंदाजी करण्यासाठी अर्शदीपची निवड केली. शमी, आपण सर्वांनी पाहिले की तो काय आहे आणि नवीन चेंडूसह काय करू शकतो. त्यामुळे आता शमी परतला आहे आणि नवीन चेंडूच्या अनुपस्थितीत सिराजचा प्रभाव थोडा कमी होतो. आम्ही फक्त तीन वेगवान गोलंदाज घेतले आहेत. कारण आम्ही अनेक अष्टपैलूंना संधी दिली ​​आहे.”

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “त्याला संघातून बाहेर पडावे लागले हे दुर्दैव आहे. पण विशिष्ट भूमिका बजावू शकतील असे खेळाडू आणण्यासाठी आमच्याकडे पर्याय नव्हता. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे नवीन चेंडूने चांगली कामगिरी करु शकतात. मधल्या फळीत गोलंदाजी करू शकतात आणि बॅकएंडवर गोलंदाजी करू शकतात.”

हेही वाचा – Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठी अपडेट! विराट कोहली आणि केएल राहुल ‘या’ मोठ्या स्पर्धेला मुकणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

Story img Loader