Champions Trophy 2025 Yashasvi Jaiswal selected in Indian squad : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वनडे संघात पहिल्यांदाच यशस्वी जैस्वाल संधी देण्यात आली आहे.

यशस्वी जैस्वालची भारताच्या एकदिवसीय संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वीने आतापर्यंत करिअरमध्ये केवळ कसोटी आणि टी-२० सामने खेळले आहेत. त्याची निवड करण्यबाबत कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sanju Samson is unlikely to get a chance in the Indian team for Champions Trophy 2025 reports
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Ravindra Jadeja too go out If Varun Chakravarty Gets Picked Aakash Chopra on Champions Trophy 2025 Squad
Champions Trophy 2025 : ‘या’ फिरकीपटूमुळे रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून होणार बाहेर? माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य

यशस्वीच्या निवडीवर रोहित काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला, “गेल्या ६-८ महिन्यांत त्याने जी काही कामगिरी केलीय त्याच्या आधारे आम्ही त्याची निवड केली आहे. तो आतापर्यंत एकदिवसीय खेळला नाही, पण आम्ही त्याची निवड केली आहे. त्याने क्षमता दाखवली आहे. कधीकधी आपल्याला हे करण्याची आवश्यकता असते. प्रत्येकाबद्दल बोलायचे तर आपण सर्वांना संतुष्ट करू शकत नाही. होय, हा एक कठीण निर्णय आहे, परंतु आम्हाला तो घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – Rohit Sharma : ‘मला यानंतर तास दीड तास बसावं लागेल ते फॅमिलीचं बोलायला. सगळे मलाच विचारतायेत’; रोहित माईकचं विसरला, आगरकरांना काय म्हणाला?

यशस्वी जैस्वालची आतापर्यंतची कामगिरी –

यशस्वी जैस्वालच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल सांगायचे तर, तो आतापर्यंत १९ कसोटी खेळला आहे. या कालावधीत त्याने ३६ डावांमध्ये ५२.८८ च्या सरासरीने आणि ६५.६६ च्या स्ट्राईक रेटने १७९८ धावा केल्या आहेत. यशस्वीच्या नावावर कसोटीत १० अर्धशतके आणि ४ शतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २१४ आहे. त्याचबरोबर २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या २२ डावात ७२३ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये ५ अर्धशतकांसह त्याने एक शतक झळकावले आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : संजू सॅमसनला विजय हजारे ट्रॉफीत न खेळल्याची मिळाली शिक्षा? शेवटच्या वनडेत झळकावलं होतं शतक

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

Story img Loader