Champions Trophy PAK vs NZ Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे, हा पहिलाच सामना कराचीमधील नॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान वि न्यूझीलंड सामना सुरू होताच पाकिस्तानचा महत्त्वाचा खेळाडू दुखापतीबाहेर मैदानाबाहेर गेला आहे. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवरच मैदानात त्याला दुखापत झाली. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा फखर जमान. फखर जमान संघासाठी मोठा महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.

पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने गोलंदाजीला सुरूवात केली तर न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे आणि विल यंगची जोडी फलंदाजीसाठी उतरली. या पहिल्याच सामन्यात फखर जमान सीमारेषेजवळ गोलंदाजी करत होता. फखर चेंडू पकडण्यासाठी धावत असताना त्याला दुखापत झाली. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. फखर जमानची दुखापत किती गंभीर आहे हे याबाबत कल्पना नाही, पण त्याच्या जागी कामरान गुलाम मैदानात उतरला.

फखर जमानची दुखापत गंभीर असल्यास पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. कारण संघाचा दुसरा सलामीवीर सॅम अय्युब दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर पडला आहे आणि आता जर फखरलाही दुखापत झाली आणि तो खेळू शकला नाही तर पाकिस्तानला सलामीवीराच्या भूमिकेत स्पर्धा सुरू असतानाचा मोठा बदल करावा लागेल. सॅम अयुबच्या दुखापतीमुळे पाकिस्तानने बाबरला तिसऱ्या क्रमांकावरून सलामीवीराची भूमिका देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमधून चार मोठे खेळाडू आधीच संघाबाहेर झाले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन, उस्मान खान, कामरान गुलाम आणि फहीम अश्रफ संघाबाहेर आहेत. संघासाठी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिस रौफ फिट असून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत झाले आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी सोपा असणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पाकिस्तानने न्यूझीलंडला कधीच पराभूत केलेले नाही. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेतही न्यूझीलंडने पाकिस्तानला दोनदा पराभूत केले होते, त्यापैकी एक अंतिम सामना होता. सध्याच्या घडीला १० षटकांत न्यूझीलंडने डेव्हॉन कॉन्वे आणि केन विल्यमसनच्या रूपात दोन मोठे विकेट गमावले आहेत. तर संघाने २ विकेट गमावत १० षटकांत ४ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर डॅरिल मिचेल आणि विल यंगची जोडी आहे.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन –

फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान(यष्टीरक्षक, कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:

डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओरूक