आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत उद्या मंगळवारी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्यात विजय प्राप्त करून उंपात्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा भारतीय संघाचा मनसुबा आहे. तसेच हा सामना जिंकून आपल्या विजयाची घौडदौड अशीच कायम राखण्याच्या प्रयत्नात धोनी ब्रिगेड खेळेल. दोन्ही संघांनी मालिकेच्या सलामिच्या सामन्यात विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकला तर आपले उपांत्य फेरीत खेळण्याचे तिकीट पक्के होईल हेही दोन्ही संघांना माहित आहे. तसेच आयपीएलमध्ये खेळल्याने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांच्या खेळीचे उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे या दोन संघादरम्यान, अतितटीचा सामना पाहावयास मिळेल.
दोन्ही संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन स्मिथ हे आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातून खेळतात, तर क्रिस गेल आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांच्या खेळीतील सामर्थ्य आणि दुर्बलबाजू माहित आहे.         
आयसीसीच्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स करंडक मालिकेतील याआधीच्या सामन्यांवर नजर टाकली असता भारताने दुखापतग्रस्त दक्षिण आफ्रिका संघाचा २६ धावांनी पराभव केला. यासामन्यात भारताने ३३१ धावांचे लक्ष्य आफ्रिकासमोर ठेवले होते. तर, वेस्ट इंडिजने पाकिस्तान संघावर दोन विकेट्सने विजय मिळवला.

Story img Loader