Champions Trophy South Africa Updated Squad: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी अनेक संघांचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. त्यामुळे संघांना बदली खेळाडूचा पर्याय शोधावा लागत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधारचं दुखापतग्रस्त असून त्यांच्यासमोर मोठा पेच आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे दोन गोलंदाज एनरिक नॉर्किया आणि गेराल्ड कुत्सिया यांनाही दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पाहावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता दक्षिण आफ्रिकेने नॉर्कियाच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. आता एका खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या संघात प्रवेश केला आहे ज्याने फक्त एक आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेने एनरिक नॉर्कियाच्या जागी कॉर्बिन बॉशचा आपल्या संघात समावेश केला आहे.

कॉर्बिन बॉश आपल्या कारकिर्दीत प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. एवढेच नाही तर त्याची ही पहिलीच आयसीसी स्पर्धा असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात एनरिक नॉर्कियाचा प्रथम समावेश करण्यात आला होता. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे नॉर्कियाला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावे लागले. आता त्याच्या जागी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ३० वर्षीय कॉर्बिनला आपल्या संघात स्थान दिले आहे.

कॉर्बिन बॉशला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत केवळ दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये एक कसोटी आणि एक वनडेचा समावेश आहे. २०२४ मध्ये त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. कसोटीत बॉशने ८१ धावा केल्या आणि ५ विकेट घेतल्या. एका वनडेमध्ये त्याने४० धावा केल्या आणि एक विकेट घेतली. मात्र, आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांच्या नजरा आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, टोनी डी जॉर्झी, मार्को यान्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन माक्ररम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डेर डुसेन