Champions Trophy Final Venue: भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्स राखून पराभव करत कांगारूंना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयामुळे आणि भारताने अंतिम फेरी गाठल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र आता या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही, हेही निश्चित झालं आहे. आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या देशात जेतेपदाचा सामना होणार नाही, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सर्व तयारीवर पाणी फेरलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता ९ मार्चला होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आयसीसीने आधीच ठरवलं होतं की जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला तर फायनल पाकिस्तानमध्ये होणार नाही. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असले तरीही बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता, संघातील खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता.

भारताने आपले तिन्ही साखळी सामने दुबईत खेळले आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामनाही याच स्टेडियमवर खेळला गेला. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंडच्या सामन्यानंतर भारताचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी संघ निश्चित होईल.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले तेव्हाच नमूद केले होते की उपांत्य फेरी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आणि भारताची उपांत्य फेरी दुबईत होईल असे सांगण्यात आले. भारत फायनलमध्ये पोहोचल्यास जेतेपदाचा सामनाही दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होईल, असेही सांगण्यात आले. पण जर भारतीय संघ अंतिम फेरीत जाऊ शकला नाही तर अंतिम सामना लाहोरमध्येच खेळवला जाईल. टीम इंडियाच्या विजयामुळे आता फायनलचे ठिकाणही निश्चित झाले आहे.