चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची आज(शनिवार) निवड करण्यात आली. आयपीएल-६ मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे विनय कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली असून गौतम गंभीर आणि युवराज सिंगला संघातून वगळण्यात आले आहे. दिनेश कार्तिकला तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.
पुढील महिन्यात सुरू होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची(बीसीसीआय) बैठक झाली. यात गौतम गंभीरच्या जागी शिखर धवन याला स्थान देण्यात आले आहे. तसेच मुरली विजय, उमेश यादव यांचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल-६ मधील उत्तम खेळाच्या पार्श्वभूमिवर दिनेश कार्तिकला भारतीय संघात मिळवता आले आहे.
* चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर. अश्‍विन, इरफान पठाण, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, ईशांत शर्मा, अमित मिश्रा आणि विनय कुमार.  

Story img Loader