ICC Champions Trophy History and Records: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा १९ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार असून २०२५ मध्ये होत असलेल्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असले तरी भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.पण या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा नेमका इतिहास काय आहे आणि ही स्पर्धा कधी सुरू झाली, जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरूवातीला दर २ वर्षांनी खेळवली जात असे. यानंतर ही स्पर्धा दर ४ वर्षांनी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता ही स्पर्धा चक्क ९ वर्षांनी म्हणजेच यंदा २०२५ मध्ये होणार आहे. पण इतक्या वर्षांनंतर ही स्पर्धा होण्यामागचं काय कारण आहे, पाहूया.

चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाते, त्यामुळे या स्पर्धेला सुरूवातीला मिनी वर्ल्डकपदेखील म्हणत असत. वनडे विश्वचषकानंतर या आयसीसी स्पर्धेला खूप महत्त्व होते. या स्पर्धेचं नाव सुरूवातीला ‘ICC नॉकआऊट’ असं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास हा २७ वर्षे जुना आहे. ही स्पर्धा प्रथम १९९८ मध्ये खेळवली गेली, त्यावेळी या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सीझनचे विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने जिंकले होते. आफ्रिकेने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव केला. यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसरा हंगाम २००० मध्ये केनियामध्ये खेळवण्यात आला, जेव्हा न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

ICC Champions Trophy 1998 Photo
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ मधील दक्षिण आफ्रिका ट्रॉफी स्वीकारतानाचा फोटो (@Champions trophy website)

दुसऱ्या सीझननंतर या स्पर्धेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढचा म्हणजेच २००२ मध्ये तिसरा सीझन झाला, त्यानंतर या आयसीसी स्पर्धेला चॅम्पियन्स ट्रॉफी असे नाव देण्यात आले. श्रीलंकेत खेळलेला हा तिसरा सीझन भारतीय संघ आणि श्रीलंकेने संयुक्तपणे जिंकला होता.

२००४ मध्ये या स्पर्धेच्या चौथ्या सीझनचं यजमानपद इंग्लंडकडे होते. त्यानंतर वेस्ट इंडिजने इंग्लिश संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर २००६ च्या मोसमाचे आयोजन भारतात करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Champions Trophy 2002 India and Sri Lanka Winners
भारतीय संघ आणि श्रीलंकेने संयुक्तपणे जिंकले चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद (@Champions trophy website)

आतंकवादी हल्ल्यामुळे स्पर्धा रद्द

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा हंगाम २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केला जाणार होता. पण दहशतवादी हल्ल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. २००८ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दर २ वर्षांच्या ऐवजी ४ वर्षांच्या अंतराने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २००९ मध्ये, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. चार वर्षांनंतर २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

India Winner of Champions Trophy 2013
२०१३ मध्ये भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद स्वीकारताना (@Champions trophy website)

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ICC का बंद करणार होती?

आयसीसीने २०१३ नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याची योजना आखली होती. याचे कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC), जी २०१७ मध्ये सुरू होणार होती. यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, टी२०, एकदिवसीय) एक विशिष्ट स्पर्धा निश्चित होत होती आणि त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. वनडे क्रिकेट उतरणीला कसोटीची वर्ल्डकपच्या धरतीवरचा मिनी वर्लेडकप

आयसीसीचे तत्कालीन सीईओ डेव्हिड रिचर्डसन म्हणाले होते की, ४ वर्षांत तिन्ही फॉरमॅटसाठी प्रत्येकी एक जागतिक स्पर्धा हे योग्य आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी WTC स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काही कारणास्तव वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१७ मध्ये सुरू झाली नाही. त्यानंतर आयसीसीने त्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला.

२०२१ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा का नाही झाली?

२०१३ नंतर २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली. त्यानंतर प्रथमच पाकिस्तानने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यानंतर ही स्पर्धा २०२१ मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक होता, यानंतर २०२३ मध्ये वनडे विश्वषचकाचे आयोजन करण्यात आले होते. तर २०२४ मध्ये पुन्हा टी-२० विश्वचषक खेळवण्यात आला, ज्याचे विजेतेपद भारताने जिंकले. यामुळे आता तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.

वर्षयजमानपदविजेताउपविजेता
१९९८बांगलादेशदक्षिण आफ्रिकावेस्ट इंडिज
२०००केनियन्यूझीलंडभारत
२००२श्रीलंकाभारत और श्रीलंका (संयुक्त)
२००६इंग्लंडवेस्ट इंडिजइंग्लंड
२००६भारतऑस्ट्रेलियावेस्ट इंडिज
२००९दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियान्यूझीलंड
२०१३इंग्लंडभारतइंग्लंड
२०१७इंग्लंडपाकिस्तानभारत

Story img Loader