Hasan Ali on indian Cricket Team Champions Trophy: भारत आणि पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कडवे प्रतिस्पर्धी मानले जातात. मग ते राजकीय मुद्दे असोत किंवा मग क्रीडास्पर्धांचा आखाडा. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमधील परिस्थिती आणि भारतातीत दहशतवादी कारावाया या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांसाठी संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा क्रीडाविश्वाच्या पलीकडे राजकीय पातळीवर हाताळला जाऊ लागला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशाबाबत मोठी चर्चा पाहायला मिळत असताना पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीनं मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय घडतंय क्रिकेटविश्वात?

यंदाच्या वर्षी झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं गतविजेत्या सघांना पराभवाची धूळ चारत आपलं नाव ट्रॉफीवर कोरलं. भारतानं दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचवेळी पाकिस्तानचं आव्हान मात्र सुपर ८ फेरीतच संपुष्टात आलं. भारतानं साखळी सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Pakistan Cricket) या दोन्ही संघांमधील सामन्याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. पण पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपद असल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेसाठी जाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचे सामने खेळणार नसल्याचं BCCI नं याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांत भारतीय संघानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्येच होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ तिथे जाईल का? यावर खल सुरू झाला आहे. एकीकडे बीसीसीआयनं आपली स्पष्ट भूमिका कळवलेली असताना दुसरीकडे पाकिस्तानही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाकिस्तानसह इतर काही देशांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले, तर भारतीय संघाचे सामने पाकिस्तान वगळता इतर देशांमध्ये ठेवता येतील, असा एक पर्याय मांडण्यात आला आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासाठी नकार दिला आहे. (Pakistan to Host Champions Trophy)

“भारतीय संघासह किंवा त्यांच्याशिवाय…”

चॅम्पियन्स ट्रॉफीवरून राजकारण चालू असतानाच पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीनं याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. भारत आला नाही, तर भारताशिवाय आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवू, असं हसन अलीनं म्हटलं आहे.

Ajit Agarkar : हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादव का झाला टीम इंडियाचा कर्णधार; अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलं कारण

“जर आम्ही भारतात जाऊन खेळू शकतो, तर मग त्यांनीही इथे यायला हवं. अनेकांनी अनेकदा सांगून झालंय की राजकारण आणि खेळ यांना स्वतंत्रच ठेवलं पाहिजे. पण जर तुम्ही दुसऱ्या बाजूने याकडे पाहाल, तर अनेक भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याची इच्छा मुलाखतींमधून व्यक्त केली आहे. याचा अर्थ भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये येण्याची इच्छा आहे. पण अर्थात, त्यांना काही नियम पाळावे लागतात, त्याची काही धोरणं आहेत, त्यांचं क्रिकेट मंडळ यासंदर्भात निर्णय घेतं”, असं हसन अलीनं पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितल्याचं स्पोर्ट्सकीडानं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.

“पीसीबीनं म्हटलं स्पर्धा इथे होणार तर इथेच होणार”

दरम्यान, हसन अलीनं पीसीबीनं अर्थात Pakistan Cricket Board ने घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली. “आमच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी जर सांगितलंयकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार तर ती पाकिस्तानातच होणार. जर भारताला इथे यायचं नसेल, तर आम्ही त्यांच्याशिवाय खेळू. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलं जायला हवं. जर भारताला स्पर्धेत सहभागी व्हायचं नसेल, तर त्याचा अर्थ असा नाही की क्रिकेटच संपलं. भारताशिवाय इतरही अनेक देश आहेत जे क्रिकेट खेळतात”, असं थेट विधान हसन अलीनं केलं आहे.

२००८ नंतर थेट २०२५!

पाकिस्तानमध्ये गेल्या १६ वर्षांत एकही मोठी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली नाही. याआधी २००८ साली पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, २००९ साली लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर हल्ला झाला. त्यानंतर खुद्द पाकिस्तानच्या संघालाही त्यांचे उर्वरीत सामने यूएईमध्ये खेळावे लागले होते. त्यानंतर जगभरातल्या अनेक देशांनी आपले संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर Pakistan Cricket Board आयोजन करत असलेल्या या स्पर्धेकडे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.