सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले. सुरुवातीला फलंदाजी करण्यास उतरलेला भारतीय संघ सात गड्यांच्या मोबदल्यात ३३१ धावा करू शकला. भारताची धावसंख्या उभारण्यात धवन, शर्मा यांच्यासोबत रविंद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. 
धवनने ११४, शर्माने ६५, जडेजाने ४७ धावांची खेळी केल्यामुळे भारताला प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चांगली धावसंख्या उभारता आली. धवनने १२ चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने आपले शतक पूर्ण केले. शर्माने ८ चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ६५ धावा केल्या. सलामीच्या या दोघांनंतर मधल्या फळीतील फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. विराट कोहली ३१ धावांवर, दिनेश कार्तिक १४ धावांवर तर सुरैश रैना नऊ धावांवर बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंह धोनही २७ धावा काढून तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेच्या ऱॅन मॅक्लारेन याने तीन गडी तर लोनवाबो सॉटसोबे याने दोन गडी टिपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा