Champions Trophy India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार की नाही हेही भारताने स्पष्ट केलेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते. म्हणजे भारत आपले सामने पाकिस्तानात नाही तर इतर कोणत्या देशात खेळेल. भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यास नसल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे आणि पाकिस्तानी खेळाडू या गोष्टीबद्दल संतापले आहेत. पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू जावेद मियांदादने भारतावर खिल्ली उडवल्याचा आरोप करत मोठा दावाही केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआयने दिलेल्या माहितीमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद म्हणाले, “मस्करी सुरू आहे का? आम्ही जर भारताबरोबर अजिबात सामने खेळलो नाही तरीही पाकिस्तान क्रिकेट टिकेल आणि फक्त टिकणारच नाही चांगली प्रगतीही करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला नाही तर आयसीसीला इतर स्पर्धांमधून पैसे कसे मिळतात हे मला पाहायचं आहे.”

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. भारतीय खेळाडूंना पाकिस्तानमध्ये सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी सांगितले. इंझमाम उल हक म्हणाले, “ते क्रिकेटची मोठी संधी हिरावून घेत आहेत. पाकिस्तानमध्ये टीम इंडियाला कोणताही धोका नाही आणि खरंतर भारतीय संघाचे पाकिस्तानात चांगले आदरातिथ्य केले जाईल.”

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

यानंतर पाकिस्तानचा पूर्व कर्णधार रशीद लातिफने पीसीबीने ठोस वक्तव्य करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रशीद म्हणाला, “बस्स झालं. जगातील इतर संघ पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय खेळत असताना भारताचा हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही त्याचा निर्णय अस्वीकार्य मानला पाहिजे. खेळ आणि राजकारण हे एकत्र करू नये, असे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान म्हणाला आहे.

२००८ मधील आशिया कपनंतर भारतीय संघ पाकिस्तानात एकही सामना खेळण्यासाठी गेलेला नाही. पाकिस्तानचा संघ २०१६ साली टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता, याशिवाय २०१२2१३ मध्ये पाकिस्तानी संघ ४ सामन्यांची वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी आला होता. दोन्ही संघांमधील ही अखेरची द्विपक्षीय मालिका होती. तर गेल्यावर्षी वर्ल्डकप २०२३ साठीही पाकिस्तान संघ भारतात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy javed miandad angry on india for not travelling pakistan said if we dont play india at all pakistan cricket will prosper bdg