आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेतील शुक्रवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना डकवर्थ लुईस नियमावलीनुसार अनिर्णित अवस्थेत संपला. त्यामुळे सरासरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने ‘ब’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती असणाऱ्या या सामन्यात पावसाने अडथळे आणले. त्यामुळे सामना ३१ षटकांचा खेळविण्यात आला. नाणेफेक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर कॉलिन इमग्रामने झळकावलेले अर्धशतक आणि डेव्हिड मिलरच्या तडफदार ३८ धावांच्या खेळीने आफ्रिका संघाने ३१ षटकांत ६ बाद २३० धावा केल्या.
आफ्रिकेचे २३० धावांचे आव्हान स्विकारत वेस्टइंडिजची चांगली सुरुवात झाली. ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ यांनी फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरवात केली. पण, मॉरिसच्या गोलंदाजीवर गेल ३६ धावांवर बाद झाल्यानंतर वेस्टइंडिजचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत होते. सामन्याच्या २७ व्या षटकात पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला. त्यावेळी वेस्टइंडिजची धावसंख्या ६ बाद १९० अशी होती. डकवर्थ लुईस नियमानुसार या धावसंख्येनुसार सामन्याचा निकाल अनिर्णित लागला आणि आफ्रिका संघाने सरासरीच्या जोरावर मालिकेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा