राज्य मल्लखांब संघटनेच्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या निवडणुकीत नगरचे प्रताप सुसरे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने परिवर्तन घडवले. संघटनेच्या अखिल भारतीय महासंघाचे माजी कार्यवाह उदय देशपांडे (मुंबई शहर) यांच्यासह संघटनेतील काही दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. सुसरे यांची राज्य संघटनेच्या मानद सचिवपदी निवड झाली.
वर्धा येथे राज्य कार्यकारिणीच्या १४ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात सुसरे यांच्या मंडळाने ११ जागांवर विजय मिळवला. विरोधी गटास ३ जागा मिळाल्या. विजयी उमेदवार असे: अध्यक्ष-राजेंद्र अधिकारी (नागपूर), उपाध्यक्ष- डॉ. सुभाष डोंगरे (यवतमाळ), कार्याध्यक्ष- यु. पी. लटपटे (परभणी), उपकार्याध्यक्ष-महादेव झुंजे (लातूर), कुलदीपसिंह जाट (नांदेड), सहसचिव- संजय सुकळकर (वर्धा), भूपेंद्र मालपुरे (धुळे) व पांडुरंग वाघमारे (सोलापूर), कोषाध्यक्ष- हरिदास बोंबलट (ठाणे). सदस्य- श्रीकृष्ण ताकवले (बुलढाणा), सुजीत शेडगे (सातारा), यतिन केळकर (पुणे) व शांताराम जोशी (रत्नागिरी). देशपांडे यांच्यासह दत्ताराम दुद्दम (मुंबई उपनगर), सत्यजित शिंदे (पुणे) व विश्वतेज मोहिते (सातारा) यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नवी कार्यकारिणी ५ वर्षांसाठी आहे. निवडणुकीनंतर नगरच्या रेल्वेस्थानकावर विजयी उमेदवारांचे जिल्हा संघटनेचे शिरीष रसाळ, अनिल उत्पात, हेमंत कुलथे, प्रशांत मोहोळे, उमेश झोटींग आदींनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा