ICC World Cup 2023: रविवारी विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. यासह दासुन शनाकाचा संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २ नोव्हेंबरला सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचे संघ आमनेसामने असतील. याआधी २०११च्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंकेचे संघ वानखेडे स्टेडियमवर भिडले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत २८ वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे

मात्र, भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. रोहित शर्मा आणि कंपनी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात रोहित शर्माचा संघ बांगलादेशशी भिडणार आहे. मोहिमेतील सर्वात मोठा आणि सर्वात मनोरंजक सामना असणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर

हेही वाचा: Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या पराभवानंतर MCCला ऑस्ट्रेलियन संघाची का मागावी लागली माफी?

बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये सुरू असलेल्या सर्व नाट्यादरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआय या दोघांनीही अहमदाबादमध्ये न खेळण्याची पीसीबीची योजना नाकारली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय श्रीलंका विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, त्यामुळे त्याला भारताच्या गटात स्थान दिले जाईल आणि २ नोव्हेंबरला भारताशी सामना होईल.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान व्यतिरिक्त भारत आणखी तीन मोठ्या संघांशी भिडणार आहे. भारतीय क्रिकेट संघ २२ ऑक्टोबरला धर्मशाला येथे न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ लखनऊच्या एकाना स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. भारताचा सामना ५ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

हेही वाचा: Ashes 2023: MCCने तीन सदस्यांना केले निलंबित; लॉंग रूम घटनेवर उस्मान ख्वाजाची टीका, म्हणाला, “मी गप्प बसून ऐकून घेणार…”

विश्वचषक २०२३ मधील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई

११ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान – दिल्ली

१५ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद

१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे

२२ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड – धरमशाला

२९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड – लखनऊ

२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर श्रीलंका – मुंबई

५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता

११ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर १ – बंगळुरू

Story img Loader