India vs South Africa 1st Test Pitch Report : सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या खेळपट्टीबद्दल क्युरेटरने माहिती दिली आहे. क्युरेटर ब्रायन ब्लॉय यांच्या मते, सेंच्युरियनची खेळपट्टी फलंदाजांसाठी अग्नीपरीक्षा असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामन्यादरम्यान पाऊस अपेक्षित असल्याने खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते, याकडे ब्रायनने लक्ष वेधले. ते म्हणाले की, कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाचा धोका आहे. येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे तापमान कमी होईल आणि अशा परिस्थितीत फिरकीपटूंना मदत मिळणे कठीण होईल.

पीटीआयशी बोलताना ब्लॉय म्हणाले, ‘तापमान खूपच कमी असेल, सुमारे २० अंश असण्याची शक्यता आहे. सध्या तापमान ३४ अंश असून ते २० पर्यंत खाली जाऊ शकते. मला माहित नाही की परिस्थिती कशी असेल. पहिल्या दिवसाचा खेळ होणार की नाही, याचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे. आशा आहे की तिसऱ्या दिवशी आम्हाला काही खेळण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत खेळपट्टी किती वळण देईल हे मला माहीत नाही.’

हेही वाचा – IPL 2024 : एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य! म्हणाला, ‘पंजाब किंग्जला ‘या’ खेळाडूवर इतके पैसे खर्च करण्याची गरज नाही’

क्युरेटरने असेही सांगितले की, जर खेळपट्टी कव्हरने झाकलेली असेल तर प्रथम फलंदाजी करणे कठीण होईल. ब्लॉय म्हणाले, ‘मी हवामानाची हमी देऊ शकत नाही, परंतु दोन दिवस खेळपट्टी कव्हर्सने झाकलेली राहिली, तर येथे फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल. कारण ती बर्याच काळापासून झाकलेली आहे आणि त्यावर कोणतेही रोलिंग नाही. सध्याच्या परिस्थितीत सामना खेळण्यासाठी मैदान कसे तयार केले जाईल हे आम्हाला माहीत नाही.’

हेही वाचा – Alex Carey : ‘त्यांचा खिसा पैशाने भरला पण स्वभावात…’, आयपीएल लिलावानंतर ॲलेक्सने स्टार्क-कमिन्सला काढला चिमटा

ब्लॉय म्हणाले, ‘त्यामुळे तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सामना सुरू झाला, तर आम्हाला जास्त वेळ मिळणार नाही. कारण तुम्ही सकाळी १० वाजता खेळायला सुरुवात करता आणि थंड हवामान आणि सकाळी खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला विश्वास आहे की गोलंदाजांना येथे मदत मिळेल.’ खेळपट्टीचे स्वरूप समजून घेऊन आमची रणनीती तयार ठेवणे हा आमचा उद्देश असल्याचे ब्लॉय यांनी सांगितले. एकतर इथली खेळपट्टी हिरवीगार असेल किंवा काही गवत कापले जाईल. पण मला आनंद आहे की कमी गवत आहे.