इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या हंगामासाठी चेन्नई येथे लिलाव सुरु आहे. ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल आणि जेमिन्स यांना कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर केदार, जाधव आणि हरभजन सिंह यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. आयपीएलच्या लिलावात यंदा भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही आपलं नाव नोंदवलं होतं. चेतेश्वर पुजाराला घेण्याची हिंमत कोणताही संघ करणार का? अशी चर्चा लिलावापूर्वी सुरु होती. मात्र, धोनीच्या चेन्नई संघानं चेतेश्वर पुजाराला आपल्या गोठात सामिल करुन घेतलं आहे.
अनुभवी चेतेश्वर पुजाराला त्याच्या मूळ किंमतीमध्ये म्हणजेच ५० लाख रुपयांत चेन्नईनं आपल्या गोठात घेतलं आहे. लिलावापूर्वी सोशल मीडियावर पुजाराला चेन्नई संघ घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर चेन्नईनं अनुभवी पुजाराला संघात स्थान दिलं आहे.
कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघानं खरेदी केल्यानंतर लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. आयपीएलनं याचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ –
A round of applause at the @Vivo_India #IPLAuction as @cheteshwar1 is SOLD to @ChennaiIPL. pic.twitter.com/EmdHxdqdTJ
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
होस्ट ह्यूज एडमिड्स यानं पुजाराला ‘Sold’ म्हटल्याचं दिसत आहे. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्याचेही दिसत आहे. याशिवाय रोवमॅन पोवेल, शॉन मार्श, कोरी अँडरसन, डॅरेन ब्राव्हो यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. तसेच रेसी वान डेर डुसेन आणि मार्टिन गुप्टिल यांच्याशिवाय पवन नेगीही अनसोल्ड राहिला आहे.