गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या चेल्सी संघाला बाद फेरीत मजल मारण्यात अपयश आले. चेल्सीला ‘ई’ गटातून अंतिम १६ जणांत स्थान मिळवण्यासाठी ज्युव्हेन्टस संघ हरणे गरजेचे होते. पण ज्युव्हेन्टसने शख्तार डोनेत्सक संघावर १-० असा विजय मिळवला आणि गटात १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. शख्तार डोनेत्सक १० गुणांवर राहिला. चेल्सीचेही १० गुण असले तरी त्यांना गोलफरकाच्या बळावर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
‘फ’ गटातून बायर्न म्युनिच आणि व्हॅलेन्सिया संघांनी आगेकूच केली. बायर्न म्युनिचने बेट बोरिसोव्हवर ४-१ अशी तर व्हॅलेन्सियाने स्पेनच्या लिले संघावर १-० अशी मात केली. ‘ग’ गटातून बार्सिलोना आणि सेल्टिक फुटबॉल क्लबने अंतिम १६ जणांत मजल मारली.     

Story img Loader