चेन्नई आणि बंगळुरू समोरासमोर; मुंबईशी दिल्लीची लढत
रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकासह बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इतिहास घडवला. या ऐतिहासिक यशानंतर असंख्य सत्कार आणि बक्षीस वितरण कार्यक्रमांसाठी सिंधू सातत्याने मुंबईत येत होती. मात्र तिचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळत नव्हती. मात्र प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने सिंधूला खेळताना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना मंगळवारी मिळणार आहे. पीबीएल स्पर्धेत सिंधू चेन्नई स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करत असून, मंगळवारी या संघाची लढत बंगळुरू ब्लास्टर्स संघाशी होणार आहे.
टाटा खुल्या स्पर्धेचा अपवादवगळता मुंबईत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन होत नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणारी सिंधू आता प्रामुख्याने सुपर सीरिज तसेच ग्रां.प्रि. स्पर्धामध्ये खेळत असल्याने मुंबईकरांना आणि पर्यायाने देशवासियांना सिंधूला खेळताना पाहण्याची संधी मिळतच नाही. मात्र पीबीएलच्या माध्यमातून देशवासीयांची लाडकी लेक झालेल्या सिंधूला वरळी येथील एनएससीआय इन्डोअर स्टेडियममध्ये प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची दुर्मीळ संधी मुंबईकरांसमोर आहे. चेन्नई स्मॅशर्सच्या सिंधूचा मुकाबला बंगळुरूच्या चेयुंग गान यी हिच्याशी होणार आहे. रविवारी झालेल्या लढतीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कॅरोलिन मारिनने सिंधूला नमवले होते. कॅरोलिनच्या तुलनेत सिंधूसमोर सोपे आव्हान आहे. ख्रिस आणि गॅब्रिएल अॅडकॉक हे दाम्पत्य चेन्नईकरांसाठी दुहेरीत जमेची बाजू आहे. एकेरी प्रकारात पारुपल्ली कश्यप, तानगोस्क सेइनसोमबुनसूक आणि टॉमी सुगिआर्तो हे तीन शिलेदार चेन्नईच्या ताफ्यात आहेत. सुमीत रेड्डी आणि मॅड्स पिइलर कोल्डिंग पुरुष तसेच मिश्र दुहेरी प्रकारासाठी उपयुक्त आहेत. बूनसाक पोनसन्ना, सौरभ वर्मा आणि व्हिक्टर अॅक्सलेन असे एकेरीचे तीन दमदार खेळाडू बंगळुरूकडे आहेत. अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी, यो येऑन सेआंग, को स्युंग ह्य़ुान, प्रणव चोप्रा असे पंचक बंगळुरूच्या संघात असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे.
अन्य लढतीत यजमान मुंबई रॉकेट्स आणि दिल्ली एसर्स समोरासमोर असणार आहेत. अजय जयराम आणि एच.एस. प्रणॉय या भारतीय खेळाडूंवर मुंबईची भिस्त आहे. दुहेरीची धुरा चिराग शेट्टी, ली योंग देई, निप्थीफॉन फुआनफुपेट, मोहिता सचदेव, तरुण कोना, नाडीइझडा झिइबा या युवा खेळाडूंवर आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली स्युंग जी ह्य़ुआन मुंबईचा आधारस्तंभ आहे. दिल्लीकडे जॅन ओ जॉर्गेन्सन, सिरील वर्मा, सन वान हो हे त्रिकूट दिल्लीकडे आहे. निचाऑन जिंदापॉन महिला एकेरीत निर्णायक असणार आहे. व्लादिमीर इव्हानोव्ह, अक्षय देवलकर, ज्वाला गट्टा, इव्हान सोझोनोव्ह अशी भक्कम चौकडी दिल्लीकडे आहे.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर
- वेळ : संध्याकाळी ६.३० पासून