* संघ : चेन्नई सुपर किंग्ज

* कर्णधार :  महेंद्रसिंह धोनी

* सर्वोत्तम कामगिरी  : विजेते (२०१०, २०११, २०१८)

* मुख्य आकर्षण : चेतेश्वर पुजारा

‘आयपीएल’ ही अशी स्पर्धा आहे, जेथे सात अन्य संघ अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळण्यासाठी आपापसांत झुंजतात. परंतु १३ हंगामांत सर्वाधिक आठ वेळा अंतिम लढत खेळणाऱ्या चेन्नईला गतवर्षी प्रथमच बाद फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा आपल्या लौकिकाप्रमाणे खेळण्याचे ध्येय चेन्नईसमोर असेल. तिशीपल्याडच्या खेळाडूंवर अधिक भरवसा दर्शवणाऱ्या चेन्नईने यंदा कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजाराला संघात स्थान दिल्याने त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे खास लक्ष असेल. महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडून चेन्नईला फार अपेक्षा आहेत. सुरेश रैनाच्या पुनरागमनाने चेन्नईची फलंदाजी अधिक बळकट झाली असून रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, मोईन अली, सॅम करन आणि कृष्णप्पा गौतम अशा प्रतिभावान अष्टपैलूंचा त्यांच्याकडे भरणा आहे. त्यामुळे आता धोनी पुन्हा एकदा कल्पक नेतृत्वाच्या बळावर संघाला जेतेपदाची दिशा दाखवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फॅफ ड्यूप्लेसिस, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, लुंगी एन्गिडी, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, सॅम करन, जोश हेझलवूड, इम्रान ताहिर, भगत शर्मा, हरिशंकर रेड्डी, सी. हरी निशांत, नारायण जगदीशन, के. एम. आसिफ, आर. साईकिशोर, भगत वर्मा.

* मुख्य प्रशिक्षक : स्टीफन फ्लेमिंग