मुंबई : जगभरातील बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेला आज, बुधवारपासून टोरंटो, कॅनडा येथे प्रारंभ होणार आहे. यंदा खुल्या विभागात तीन, तर महिला विभागात दोन असे एकूण पाच भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाचे सामथ्र्य अधोरेखित करण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळेल.

पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने तीन दशकांहूनही अधिक काळ भारतीय बुद्धिबळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्याच्यामुळे भारतीय बुद्धिबळाला वेगळी ओळख मिळाली. परंतु त्याच्या आधी किंवा नंतर भारताचा एकही बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकला नव्हता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले. आता पुरुष विभागात आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि डी. गुकेश, तर महिलांमध्ये आर. वैशाली आणि कोनेरू हम्पी असे विक्रमी पाच भारतीय बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे भारताला बुद्धिबळातील नवी महासत्ता म्हणून संबोधले जात आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
Image of AIMIM leader Akbaruddin Owaisi.
Pushpa 2 Stampede : “चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, अभिनेता म्हणाला चित्रपट हिट होईल”, नाव न घेता ओवैसींचा अल्लू अर्जुनवर आरोप
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
Grand Finale of Loksatta Lokankika One Act drama Competition Mumbai news
‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान कोण पटकावणार? २१ डिसेंबरला मुंबईत महाअंतिम फेरी सोहळा

हेही वाचा >>>RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय

विदित (वय २९ वर्षे) आणि हम्पी (३७ वर्षे) बऱ्याच काळापासून यशस्वी कामगिरी करत असले, तरी त्यांना कारकीर्दीत प्रथमच ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्यात यश आले आहे. त्यामुळे हे दोघेही सर्वोच्च स्तरावर, विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंविरुद्ध चमकदार कामगिरीसाठी उत्सुक असतील. प्रज्ञानंद (१८ वर्षे), गुकेश (१७ वर्षे) आणि वैशाली (२२ वर्षे) हे तिघेही युवा असले, तरी त्यांना कमी लेखण्याची चूक प्रतिस्पर्धी करणार नाहीत. या तिघांनीही विविध स्पर्धातून आपला लौकिक सिद्ध केला आहे.

खुल्या विभागात तीन भारतीयांपैकी सर्वोत्तम कामगिरीसाठी सध्या प्रज्ञानंदला पसंती मिळते आहे. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेतील उपविजेतेपदासह प्रज्ञानंदने ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवली होती. अतिशय निडर आणि चाणाक्ष बुद्धिबळपटू अशी प्रज्ञानंदची ओळख आहे. त्याला या स्पर्धेदरम्यान रशियाचा दिग्गज बुद्धिबळपटू पीटर स्वीडलरचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या फेऱ्यांत लय सापडल्यास प्रज्ञानंद सनसनाटी निकालांची नोंद करू शकेल.

नाशिककर विदितने २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेचे जेतेपद पटकावत, तर गुकेशने २०२३च्या ‘फिडे’ सर्किटमधील कामगिरीच्या आधारे ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवली होती. या दोघांना गेल्या काही स्पर्धात आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना लय मिळवण्यासाठी एक-दोन फेऱ्या लागू शकतील. खुल्या विभागात फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा या अमेरिकेच्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना सध्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

हेही वाचा >>>Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य

महिलांमध्ये हम्पी सर्वोत्तम रेटिंगच्या आधारे, तर वैशाली २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेचे जेतेपद मिळवत ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरली. हम्पी आता ३७ वर्षांची असून जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरण्याची तिची ही अखेरची संधीही असू शकेल. त्यामुळे ती सर्वस्व पणाला लावून या स्पर्धेत खेळेल. भारतीय वेळेनुसार, बुधवारी मध्यरात्री या स्पर्धेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा पार पडेल, तर गुरुवारपासून लढतींना सुरुवात होईल.

‘कॅन्डिडेट्स’चे महत्त्व काय?

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. त्यामुळे ही स्पर्धा इतकी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची मानली जाते. सध्या पुरुषांमध्ये िडग लिरेन आणि महिलांमध्ये जू वेन्जून हे चीनचे बुद्धिबळपटू जगज्जेते आहेत.

स्पर्धेचे स्वरूप..

खुल्या विभागातील आठ बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन असे एकूण १४ डाव खेळतील. प्रत्येक बुद्धिबळपटूला अन्य सात बुद्धिबळपटूंविरुद्ध एकदा पांढऱ्या आणि एकदा काळय़ा मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळेल. महिला विभागातील स्पर्धाही अशाच पद्धतीने खेळवली जाईल. १४ फेऱ्यांअंती सर्वाधिक गुण असलेला बुद्धिबळपटू विजेता ठरेल. मात्र, पहिल्या स्थानासाठी दोन बुद्धिबळपटूंमध्ये बरोबरी असल्यास १४व्या फेरीनंतर ‘टायब्रेकर’ खेळवला जाईल. यात बाजी मारणारा बुद्धिबळपटू जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरेल.

स्पर्धेत सहभागी बुद्धिबळपटू

’ खुला विभाग : विदित गुजराथी, आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश (तिघेही भारत), फॅबियानो कारुआना, हिकारू नाकामुरा (दोघेही अमेरिका), इयान नेपोम्नियाशी (रशिया)*, अलिरेझा फिरूझा (फ्रान्स), निजात अबासोव (अझरबैजान).

’ महिला विभाग : कोनेरू हम्पी, आर. वैशाली (दोघी भारत), ले टिंगजी, टॅन झोंगी (दोघी चीन), कॅटेरिना लायनो, अलेक्झांड्रा गोर्याचकिना (दोघी रशिया)*, नुरग्युल सलिमोवा (बल्गेरिया), अ‍ॅना मुझिचुक (युक्रेन).

(* = रशियाचे बुद्धिबळपटू या स्पर्धेतही ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळतील.)

Story img Loader