India Chess Team Aims Historic Gold Medal in Chess Olympiad 2024: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही भारतीय संघ (पुरुष आणि महिला) खुल्या विभागात आणि महिला विभागात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याच्या जवळ आले आहेत. बुद्धिबळातील राष्ट्रीय संघासाठी ही सर्वात प्रतिष्ठित सांघिक स्पर्धा आहे. ग्रँडमास्टर आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर डी गुकेशने बुडापेस्टमधील ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यूएसएच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून भारतीय पुरुष संघाचे सुवर्णपदक जवळजवळ निश्चित केले.

Chess Olympiad 2024: भारतीय पुरुष संघ प्रथमच सुवर्णपदक जिंकणार

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरुष संघ प्रथमच सुवर्णपदक जिंकणार आहे. रविवारी २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत दोन्ही भारतीय संघ ऑलिम्पियाड क्रमवारीत अव्वल आहेत. ओपन सेक्शन संघाने शनिवारी, २१ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) अमेरिका संघाचा पराभव केला. अमेरिका या स्पर्धेत अव्वल मानांकित संघ आहे, परंतु अंतिम टप्प्यात त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

गुकेशची जबरदस्त कामगिरी

नोव्हेंबर २०२४ मध्ये सिंगापूरमध्ये पुढील जागतिक चॅम्पियनशिप सामना खेळण्यासाठी सज्ज असलेल्या डी गुकेशने भारतासाठी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला, तर अर्जुन इरिगासीने आणखी एका मॅरेथॉन खेळानंतर वेस्ली सोकडून प्रज्ञानंदच्या पराभवाचा बदला घेतला. विदित गुजराथीने लेव्हॉन अरोनियनविरुद्ध ड्रॉ सामना खेळला.

हेही वाचा – Rishabh Pant Century: ऋषभ पंतचे ६३३ दिवसांच्या कमबॅकनंतर दणदणीत शतक, थेट धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

D Gukesh vs Fabiana Caruana Match in Chess Olympiad
डी गुकेश (फोटो-@ChessbaseIndia)

महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी

भारतीय महिला संघ १०व्या फेरीत बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता. महिला संघाने कमकुवत समजल्या जाणाऱ्या चीन संघाचा पराभव केला, त्या संघात टॅन झोंगी, हौ यिफान, झू वेनजुन आणि लेई टिंगजी सारख्या सर्व अव्वल खेळाडूंचा समावेश नव्हता, जे एकतर महिला वर्ल्ड चॅम्पियन होते किंवा महिला वर्ल्ड चॅम्पियनचे दावेदार होते.

हेही वाचा – IND vs BAN: “मला जडेजाचा हेवा वाटतो, मी त्याच्यासारखा…”, अश्विनचे जडेजाबाबत चकित करणारं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

दिव्या देशमुखने बाजी मारली

भारताकडून फक्त दिव्या देशमुखने चीनविरुद्ध विजय मिळवला, तर इतर सर्व भारतीयांचा सामना ड्रॉ राहिला. दिव्या देशमुखच्या विजयाने भारतीय संघाला विजय मिळाला. दिव्या देशमुखने पुन्हा एकदा संघाची स्टार परफॉर्मर असल्याचे सिद्ध केले. यासह भारतीय महिलांनी चीनचे आव्हान २.५-१.५ ने मोडून काढले. आर वैशालीच्या खेळाचेही कौतुक करावे लागेल. कठीण परिस्थितीत गुओ क्यू विरुद्ध बचाव केल्याबद्दल तिच देखील कौतुक केलं जात आहे.

Divya Deshmukh Chess Olympiad
दिव्या देशमुख ((फोटो-@ChessbaseIndia))

आर वैशालीची कौतुकास्पद कामगिरी

अखेर आर वैशालीने टॅक्टिकल शॉटचा फायदा घेत चीनच्या खेळाडूला बरोबरीत रोखले. शीर्ष बोर्डवर, डी हरिकाने झू जिनरला रोखले, तर वंतिका अग्रवालने लू मियाओईच्या चालींचा सामना करत सहज ड्रॉ मिळवला. जॉर्जियाचा संघ कझाकिस्तानविरुद्ध विजय मिळवेल या संभावनेवरून असे दिसते की भारतीय महिला देखील अव्वल स्थान मिळवतील. भारतीय महिला बुद्धिबळ संघ पुन्हा सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता आहे.