बुडापेस्ट : युवकांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मायदेशात झालेल्या गेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक पटकावणारा भारतीय पुरुष संघ यंदा बुडापेस्ट, हंगेरी येथे होत असलेल्या स्पर्धेत सुवर्णपदकाचे ध्येय बाळगून खेळणार आहे. पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदच्या अनुपस्थितीतही भारतीय संघात तारांकितांचा भरणा असून त्यांना अमेरिकेनंतर द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.

बुद्धिबळविश्वातील सर्वांत प्रतिष्ठेची सांघिक स्पर्धा अशी ख्याती असलेल्या ऑलिम्पियाडच्या ४५व्या पर्वाला मंगळवारी उद्घाटन सोहळ्यासह सुरुवात झाली, तर लढती आजपासून (बुधवार) रंगणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत खुल्या विभागात विक्रमी १९३ संघांचा समावेश असून यात अग्रमानांकित अमेरिका, भारत आणि तृतीय मानांकित चीन या केवळ तीनच संघांतील खेळाडूंचे सरासरी मानांकन गुण २७०० पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सहाजिकच या तीन संघांत जेतेपदासाठी चुरस अपेक्षित आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात

हेही वाचा >>> AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना

जगज्जेतेपदासाठीचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश, विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता आर. प्रज्ञानंद, जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला अर्जुन एरिगेसी, नाशिककर विदित गुजराथी आणि पेंटाला हरिकृष्णा (राखीव खेळाडू) यांचा भारतीय संघात समावेश आहे. २०२२ मध्ये मायदेशात झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागात भारताला तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली होती. यापैकी भारताच्या ‘ब’ संघाने चमकदार कामगिरी करताना कांस्यपदक मिळवले होते. या यशात गुकेशची भूमिका महत्त्वाची ठरली होती. आता त्याच्याकडून पुन्हा चमकदार कामगिरीची भारताला अपेक्षा असेल.

कोणाचे आव्हान?

खुल्या विभागात, भारताला प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांचेच आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला हिकारू नाकामुरा स्पर्धेत खेळणार नसला, तरी लेवॉन अरोनियन आणि वेस्ली सो यांसारख्या बुद्धिबळपटूंचा अनुभव अमेरिकेसाठी निर्णायक ठरू शकेल. चीनची भिस्त जगज्जेत्या डिंग लिरेनवर असेल. गतविजेत्या उझबेकिस्तान संघाला चौथे मानांकन असून त्यांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा मानस असेल.

महिला विभागातही संधी

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील महिला विभागात भारतीय संघाला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तारांकित बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी या स्पर्धेत खेळणार नसली, तरी जेतेपदासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनुभवी द्रोणावल्ली हरिका आणि ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत खेळलेली आर. वैशाली या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंवर भारतीय महिला संघाची भिस्त असेल. त्यांच्यासह नागपूरची दिव्या देशमुख आणि वंकिता अगरवाल यांचा भारतीय संघात समावेश असून तानिया सचदेव राखीव खेळाडू आहे. तिला काही सामने खेळायला मिळू शकतील. गेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कांस्यकमाई केली होती. गतस्पर्धेत युक्रेनचा संघ विजेता ठरला होता. यंदा मात्र त्यांचा संघ कमकुवत भासत आहे.

यापूर्वीची कामगिरी

बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात भारताने २०१४ आणि २०२२ मध्ये कांस्यपदक मिळवले होते. तसेच २०२० च्या स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्तरित्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ती स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात खेळवली गेली होती.

स्पर्धेचे स्वरूप…

खुल्या आणि महिला विभागांत एकूण ११ फेऱ्या स्वीस साखळी पद्धतीने खेळवल्या जातील. प्रत्येक फेरीतील लढतीत एका देशाचे चार खेळाडू खेळतील. प्रत्येक विजयासाठी दोन गुण दिले जातील आणि चार सामन्यांत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ त्या फेरीतील लढत जिंकेल. ११ फेऱ्यांअंती गुणतालिकेत आघाडीवर असलेला संघ विजेता ठरेल.

भारतीय संघ

● अर्जुन एरिगेसी

एलो २७७८ गुण : क्रमवारीत चौथा

● दोम्माराजू गुकेश

एलो २७६४ गुण : क्रमवारीत सातवा

● आर. प्रज्ञानंद

एलो २७५० गुण : क्रमवारीत १२ वा

● विदित गुजराथी

एलो २७२० गुण : क्रमवारीत २४ वा

● पेंटाला हरिकृष्णा

एलो २६८६ गुण : क्रमवारीत ४१ वा

Story img Loader