तिसऱ्या फेरीतील विजयानंतर बऱ्याच दिवसांनी आव्हानवीर दोम्माराजू गुकेशला बुधवारी रात्री चांगली झोप लागली असेल. कारण बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिलाच डाव गमावणे आणि तोसुद्धा पांढऱ्या मोहऱ्यांकडून; हे पचवणे कठीण असते. मात्र गुकेशने आपले मानसिक स्वास्थ्य जराही बिघडू दिले नाही आणि दुसरा डाव थोडाही धोका न पत्करता बरोबरीत सोडवला. तिसऱ्या डावात त्याचा खेळ अधिकच बहरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चिनी डावपेच उलटवले
गुकेश पहिला डाव हरल्यानंतर त्याच्यावर- विशेषत: त्याच्या अतिआक्रमक खेळावर टीकेची झोड उठली. त्यातही माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनची टीका जरा जास्तच बोचरी होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या डावात धोका पत्करून गुकेश पराभवाची परतफेड करण्याचा आटापिटा करेल अशी अटकळ चिनी संघाने बांधली असल्यास नवल नाही. मात्र, गुकेश या सापळ्यात अडकला नाही. गुकेश चुका करेल या अपेक्षेने नुसती वाट बघणारा डिंग लिरेन पांढऱ्या मोहऱ्यांनी मिळणारा वरचष्मा गमावून बसला. आपल्या खेळाच्या मर्यादांत राहून आणि संयम दाखवून गुकेशने अवघ्या २३ चालींत डिंगला डाव बरोबरीत सोडवण्यास भाग पाडले. खरे तर पांढऱ्या सोंगट्यांकडून खेळताना आणि विशेषत: पहिल्या डावात सरशी साधली असताना, जगज्जेत्याकडून आक्रमक खेळाची अपेक्षा होती. त्यामुळे अननुभवी गुकेशवर दबाव राहिला असता. मात्र, डिंगने आपला मानसिक वरचष्मा वाया घालवला आणि याची बोच त्याच्या मनात राहिली असावी, कारण तिसऱ्या डावात खेळत होता तो विचलित डिंग आणि पहिल्या डावातील आत्मविश्वासाने खेळणारा डिंग यात निश्चित फरक जाणवत होता.
हेही वाचा >>>SA vs SL Test: ४७ वर ऑल आऊट! श्रीलंकेची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या, मार्को यान्सनची जादुई गोलंदाजी
विश्रांतीनंतर काय?
चौथ्या डावात डिंगला आपली मरगळ झटकून नव्या दमाने पांढऱ्या सोंगट्यांना न्याय द्यावा लागेल. याउलट गुकेश आपला नैसर्गिक खेळ करू शकेल. जरी गुणसंख्या समान दिसत असली तरी लढतीचे पारडे गुकेशच्या बाजूने झुकलेले आहे. मात्र, गेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत इयान नेपोम्नियाशी याच्याविरुद्ध प्रत्येक पराभवानंतर चवताळून पुनरागमन करणारा डिंग आता पुन्हा बघायला मिळू शकेल. गुकेशने पहिल्या डावात आपल्या मूळ शैलीविरुद्ध खेळायचा प्रयत्न केल्यामुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला होता, हे त्याने मनोमन मान्य केल्यामुळे त्याला तिसऱ्या डावात विजय मिळाला. गुकेश पटावरील स्थितीप्रमाणे खेळण्यात तरबेज आहे, पण माजी जगज्जेत्या मिखाईल तालप्रमाणे ओढूनताणून आक्रमक होणे त्याला जमत नाही- त्याचा तो पिंडदेखील नाही. नैराश्यग्रस्त होण्याआधी डिंग हा जगातील उत्कृष्ट बचावपटूंपैकी एक मानला जात असे. त्याने लागोपाठ ९५ डाव अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. तिसऱ्या डावात हाच डिंग नको तितका धोका पत्करताना दिसला आणि तेही संगणकाइतक्या अचूकपणे खेळणाऱ्या गुकेशविरुद्ध! अशी संधी गुकेश सोडणे शक्य नव्हते आणि त्याने डिंगला अस्मान दाखवले. गुकेशच्या विजयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे आणि शुक्रवारच्या लढतीची सगळे उत्सुकतेने वाट बघत आहेत.
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)