Chetan Sharma Resignation: स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने भारतीय संघ आणि खेळाडूंशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यानंतर तो सतत वादात सापडला होता. आता त्याने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोडले आहे. चेतन शर्मा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे राजीनामा पाठवला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी आणि वन डे मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीची बैठक अनिश्चिततेच्या अवस्थेत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य निवडकर्त्याने आपला राजीनामा BCCI सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.

चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक खुलासे केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळात भूकंप झाला. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटबाबत केलेल्या खुलाशानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. हे खळबळजनक खुलासे अशा वेळी झाले आहेत जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवली जात आहे आणि पुढील दोन सामन्यांसाठीही संघ निवडला जाणार आहे. मुख्य निवडकर्त्याच्या या खुलाशाने जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची मन शरमेने खाली गेली.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका
Mayawati expels BSP leader Surendra Sagar
Surendra Sagar Expels : ‘बसपा’च्या नेत्याला ‘सपा’च्या आमदाराशी सोयरीक करणं पडलं भारी; मायावतींनी पक्षातून केली हकालपट्टी

चेतन शर्माने एका टीव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून ते खेळाडूंना इंजेक्शन घेण्यापर्यंत अनेक बाबींवर गंभीर खुलासे केले होते. चेतन शर्मा म्हणाले होते की, भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जेव्हा ८० टक्के तंदुरुस्त असतात आणि १०० टक्के तंदुरुस्त होतात तेव्हा ते इंजेक्शन घेतात. हे वेदनाशामक नाहीत. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत आढळत नाहीत. बनावट फिटनेससाठी इंजेक्शन घेणाऱ्या या सर्व खेळाडूंना बाहेरचे डॉक्टरही आहेत.

चेतन शर्माने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बुमराहच्या पुनरागमनावरून त्याच्यात आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याचा आरोपही केला होता. बुमराह अजूनही खेळात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतून तो बाहेर पडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतही तो खेळताना दिसणार नाही.

हेही वाचा: BCCI Chief Selector: चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशनवर पाकिस्तानी दिग्गज संतापला, म्हणाला “धोनीला मुख्य निवडकर्ता करा”

कोहली-गांगुली नात्यावरही बोलले

माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्मांनी केला आहे. कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर खुलासा करताना चेतन म्हणाले होते, “कोहलीला वाटत होते की सौरव गांगुलीमुळे कर्णधारपद गमवावे लागले, पण तसे नाही. निवड समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बरेच लोक होते, त्यानंतर गांगुली कोहलीला म्हणाला, “निर्णयाचा एकदा विचार करा. मला वाटते की कोहलीने ते ऐकले नाही. मुख्य निवडकर्ता चेतनने अनेक वादग्रस्त दावे केल्याने बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. बोर्डाशी करार असताना, कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही. चेतनने त्याचे उल्लंघन केले होते. या कारणामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.

चेतन यापूर्वीही वादात सापडले होते

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, यावर्षी त्यांची मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. शर्मा व्यतिरिक्त, शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नवीन वरिष्ठ निवड समितीचे इतर चार सदस्य आहेत. चेतनच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याचे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

हेही वाचा: Cheteshwar Pujara 100th Test: “कसोटी क्रिकेट हे तुमचं…”, पुजाराचा सुनील गावसकरांकडून कॅप देत सन्मान

चेतन शर्मा ७ जानेवारी २०२३ रोजी पुन्हा बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष बनले होते. त्यांचा हा दुसरा टर्म होता, मात्र यावेळी त्यांचा कार्यकाळ ४० दिवसांत संपला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेतन शर्माने दोन्ही टर्ममध्ये आपले पद गमावले आहे, गेल्या टर्ममध्ये बीसीसीआयने टी२० वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर संपूर्ण समिती काढून टाकली होती.

Story img Loader