Cheteshwar Pujara Breaks Vijay Hazare’s Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, आता रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून चेतेश्वर पुजाराने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अप्रतिम द्विशतक झळकात विजय हजारे या विक्रम मोडला. विशेष म्हणजे त्याची ही मोठी खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतीय निवड समितीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (७ जानेवारी) संध्याकाळपर्यंत घोषणा होऊ शकते. याआधीच चेतेश्वर पुजाराच्या रणजीतील द्विशतकाने निवडकर्त्यांना त्याच्या निवडीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पुजाराने हा पराक्रम केला आहे.

झारखंडविरुद्धच्या या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी झारखंडला १४२ धावांत गुंडाळले. यानंतर सौराष्ट्रने सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजी केली. हार्विक देसाई (८५), शेल्डन जॅक्सन (५४) आणि अर्पित वसावडा (६८) यांनी अर्धशतके झळकावली. त्यानंतर सौराष्ट्राने आपला पहिला डाव १५८ षटकानंतर ४ बाद ५७८ धावसंख्येवर घोषित केला आणि पहिल्या डावाच्या जोरावर ४२० धावांची आघाडी घेतली.

हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा ‘हुक्का’ ओढतानाचा VIDEO व्हायरल, माहीच्या या कृतीने चाहते झाले आश्चर्यचकित

सौराष्ट्राने आपला पहिला डाव घोषित केला, तेव्हा प्रेरक मंकडने आणि चेतेश्वर पुजार खेळपट्टीवर नाबाद होते. प्रेरक मंकडनेही येथे शतक झळकावले. त्याने १७६ चेंडूचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा केल्या. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारानेही द्विशतक झळकावले. त्याने ३५६ चेंडूचा सामना करताना ३० चौकारांच्या मदतीने नाबाद २४३ धावा केल्या. त्याने या शतकाच्या जोरावर विजय हजारे यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम मोडला.

हेही वाचा – Team India : ‘कर्णधार कोणीही असो, पण…’, टी-२० विश्वचषकात रोहित-विराट खेळण्याबाबत सुनील गावसकरांचे मोठे विधान

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय फलंदाज –

सुनील गावसकर – ८१ शतके
सचिन तेंडुलकर – ८१ शतके
राहुल द्रविड – ६८ शतके
चेतेश्वर पुजारा – ६१ शतके
विजय हजारे – ६० शतके

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara broke vijay hazares record by scoring an double century against jharkhand in ranji trophy 2024 vbm