पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी चेतेश्वर पुजाराने शानदार कामगिरी केली आहे. त्याचे आंध्रविरुद्ध अवघ्या नऊ धावांनी शतक हुकले, पण या खेळीतून फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा पूर्ण केला.
३४ वर्षीय पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. चेतेश्वर पुजाराने शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून आंध्रविरुद्ध खेळताना, भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या.
आंध्रविरुद्धच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात शतकाच्या जवळ आला. पण नऊ धावांनी हुकले. त्याने १४६ चेंडूंचा सामना करत ९१ धावांची खेळी केली. पुजाराने आपल्या खेळीत ११ चौकार लगावले. त्याची ९१ धावांची खेळी व्यर्थ गेली. कारण सौराष्ट्राचा १५० धावांनी पराभव झाला.
पुजाराने शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रविरुद्ध भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या १४५व्या सामन्यात ही कामगिरी केली आणि देशातील सरासरी ६० च्या खाली आहे. पुजाराने एकूण २४० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १८,४०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५६ शतके आणि ७३ अर्धशतके केली आहेत. पुजाराने भारतासाठी ९८ कसोटी सामने खेळले असून ४४.३९च्या सरासरीने ७०१४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १९ शतके आणि ३४ अर्धशतके आहेत.
वसीम जाफरनंतर दुसरा खेळाडू –
त्याचबरोबर भारतामध्ये सर्वाधिक प्रथम श्रेणी धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय खेळाडू वसीम जाफरच्या नावावर आहे. ज्याने १८६ सामन्यात ५३ च्या सरासरीने १४६०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान जाफरने ४६ शतके आणि ६५ अर्धशतके केली आहेत. भारतात सर्वाधिक प्रथम श्रेणी धावा करणाऱ्यांच्या यादीत वसीम जाफरनंतर पुजाराचा क्रमांक लागतो. या यादीत सचिन तेंडुलकर ९,६७७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात ९ फेब्रुवारीपासून नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे.
हेही वाचा – Brett Lee ने अर्शदीप सिंगला दिला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याने जिममध्ये…’
पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, एस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव