Cheteshwar Pujara Half Century : चेतेश्वर पुजाराला त्याच्या कामगिरीमुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याला भारतीय कसोटी संघातूनही वगळण्यात आले. मात्र पुजाराने आपली मेहनत थोडीही कमी केली नाही. आता त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने अर्पित वसावडासोबत मजबूत भागीदारीही केली आहे.

वास्तविक, राजकोटमध्ये सौराष्ट्र आणि झारखंड यांच्यात रणजी करंडक सामना खेळला जात आहे. या सामन्यात झारखंडचा संघ पहिल्या डावात केवळ १४२ धावा करत सर्वबाद झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सौराष्ट्र संघ आता फलंदाजी करत आहे. सौराष्ट्रकडून पुजारा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने शानदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. पुजाराने १२५ चेंडूंचा सामना करत नाबाद ८५ धावा केल्या आहेत. वृत्त लिहेपर्यंत त्याने ८चौकार मारले होते. पुजारामुळे सौराष्ट्र संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

या सामन्यात सलामीवीर हार्विक देसाईने सौराष्ट्रला शानदार सुरुवात करून दिली. हार्विकने ११९ चेंडूंचा सामना करत ८५ धावा केल्या. त्याच्या खेळीत १४ चौकारांचा समावेश होता. स्नेल पटेलने १५ धावांची खेळी केली. शेल्डन जॅक्सननेही अर्धशतक झळकावले. जॅक्सनने ७४ चेंडूंचा सामना करत ५४ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि एक षटकार मारला. पुजाराने जॅक्सनसोबत चांगली भागीदारी केली. त्याने अर्पितसोबत चांगली भागीदारीही केली. वृत्त लिहिपर्यंत अर्पितने ३३ धावा केल्या होत्या. वृत्त लिहिपर्यंत सौराष्ट्रने ८१ षटकानंतर ३ गडी गमावून २९६ धावा केल्या होत्या

हेही वाचा – INDW vs AUSW 1st T20 : स्मृती मंधानाने केला मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाली सामील

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सेंच्युरियन आणि केपटाऊनच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाचे फलंदाज निष्प्रभ ठरत असताना चेतेश्वर पुजारा सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. अय्यरला संघातून वगळून पुजाराचा कसोटी संघात समावेश करण्याची मागणी चाहत्यांनी केली. यामागे पुजाराच्या परदेशातील अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.