भारताच्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी विभागातील फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये ७७७ गुणांसह सातवे स्थान कायम राखले आहे. क्रमवारीतील अव्वल दहा फलंदाजांमध्ये पुजारा हा भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे, तर गोलंदाजांमध्ये ‘ऑफ-स्पिनर’ आर. अश्विन आठव्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचाच वरचष्मा असून फलंदाजीमध्ये हशिम अमला आणि गोलंदाजीमध्ये डेल स्टेन अव्वल स्थानावर विराजमान आहेत.

Story img Loader