Cheteshwar Pujara gets new responsibility in IND vs AUS Test series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून पर्थ कसोटीने सुरु होत आहे. या सामन्यापूर्वी शुबमन गिलला दुखापत झाल्यानंतर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला या मालिकेत नवीन जबाबदारी मिळाली आहे. या दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ जाहीर केला होता, तेव्हा चेतेश्वर पुजाराला या संघात संधी मिळाली नव्हती. मात्र, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी मालिकेतील महत्त्वाची भूमिका बजावली होती . त्याने अलीकडच्या काही महिन्यांत काउंटी आणि रणजी ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत. असे असूनही त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
चेतेश्वर पुजाराला मिळाली नवी जबाबदारी –
भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी नवीन जबाबदारी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली जाणार आहे. या सामन्यापूर्वी शुबमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर काही तासांनंतर चेतेश्वर पुजाराला नवीन भूमिका मिळाली आहे. या मालिकेत तो समालोचनात हात आजमावताना दिसणार आहे. पुजाराचा या पाच सामन्यांच्या मालिकेत फलंदाज म्हणून समावेश करण्यात आलेला नाही, मात्र आता तो समालोचनाद्वारे मालिकेत आपली उपस्थिती दर्शवेल. या मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन लोकांना हिंदी कॉमेंट्री फीडची सुविधा मिळणार आहे.
शुबमन गिलच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल पहिल्या कसोटीत खेळताना दिसू शकतो. देवदत्त पडिक्कलची मुख्य संघात निवड झालेली नाही. त्याचा भारत अ संघात समावेश करण्यात आला होता, परंतु आता त्याला ऑस्ट्रेलिया थांबवण्यात आले आहे. अशा स्थितीत तो पहिल्या सामन्यात खेळू शकेल, अशी शक्यता आहे.
u
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चेतेश्वर पुजाराची कामगिरी –
गेल्या काही काळापासून बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चेतेश्वर पुजाराची भूमिका आधुनिक काळातील राहुल द्रविडसारखीच आहे. त्याचे तंत्र, संयम आणि गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०१८/१९ मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी पुजाराने चार सामन्यांच्या मालिकेत ५२१ धावा केल्या होत्या. तसेच २०२०-२१ मध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. ज्यामध्ये त्याने २७१ धावांचे योगदान दिले होते, ज्यामुळे भारत संघ सलग सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता.