Inzamam ul Haq said I can’t pick Kuldeep Yadav: पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक यांनी शुक्रवारी (२२ सप्टेंबर) विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. संघाची घोषणा करताना इंझमामने एका पत्रकाराच्या प्रश्नाला असे, उत्तर दिले की सगळे हसायला लागले. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी पीसीबीने शुक्रवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.पाकिस्तानने विश्वचषकासाठी फिरकी विभागात शादाब खान, उसामा मीर आणि मोहम्मद नवाज यांची निवड केली आहे. इंझमाम-उल-हक यांनी कुलदीप यादवबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

मी कुलदीप यादवची निवड करू शकत नाही –

आशिया कप २०२३ मध्ये पाकिस्तानी फिरकीपटू खूप संघर्ष करताना दिसले. सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट घेणारा इफ्तिखार अहमद वगळता कोणताही फिरकी गोलंदाज विशेष काही करू शकला नाही. इंझमाम यांनी गंमतीने सांगितले की, पाकिस्तान आपल्या विश्वचषक संघात कुलदीप यादवची निवड करू शकत नाही. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘तुम्ही दोन्ही गोलंदाजांची चांगली आकडेवारी आणली आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुलदीप यादवची निवड करू शकत नाही. माझ्यासाठी समस्या ही आहे की तो दुसऱ्या संघातील आहे.’

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

याआधी शादाब खानच्या जागी अबरार अहमदची विश्वचषक संघात निवड होऊ शकते, अशी बातमी होती. मात्र, शादाबला संघातील स्थान वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर अबरारची प्रवासी राखीव म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, इंझमामने शादाब आणि नवाजवर विश्वास व्यक्त केला आहे. हे दोन्ही गोलंदाज भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – आयसीसीने T20 World Cup स्पर्धेची ठिकाणं केली जाहीर, १० मैदानांवर खेळवले जाणार ५५ सामने

मला आशा आहे की शादाब आणि नवाज चांगली कामगिरी करतील –

पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, ‘आम्ही शादाब आणि नवाजची निवड केली, कारण आम्हाला सातत्य हवे होते. अनेक वर्षांचा विचार करून विश्वचषक संघ निवडला जातो. तुम्ही त्यात अचानक बदल करू शकत नाही. शादाब आणि नवाज गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करत आहेत. तो मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकलेला नाही आणि आम्हाला हे देखील माहित आहे की तो त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळूही शकलेला नाही. मात्र त्याने इतिहासात चांगली कामगिरी केली असून आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.’

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानचा संघ –

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, उसामा मीर , मोहम्मद वसीम जूनियर

Story img Loader