शेन्झेन : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, तसेच सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने गुरुवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रणॉयने डेन्मार्कच्या मॅग्नस योहानसेनला २१-१२, २१-१८ असे पराभूत केले. पुरुष एकेरीत प्रणॉय हा एकमेव भारतीय खेळाडू आव्हान टिकवून आहे. आठव्या मानांकित प्रणॉयची गाठ आता जपानच्या कोडाइ नाराओकाशी पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

योहानसेनविरुद्ध सामन्यात प्रणॉयने चांगली सुरुवात करताना पहिला गेममध्ये ६-१ अशी आघाडी घेतली; परंतु योहानसेनने जोरदार पुनरागमन करताना १४-११ अशी आघाडी घेतली. यानंतर प्रणॉयने खेळ उंचावत सलग गुण मिळवले आणि पहिला गेम २१-१२ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी उत्तम खेळ केला. एक वेळ गेम १८-१८ असा बरोबरीत होता. मात्र, प्रणॉयने काही चांगले फटके मारत सलग तीन गुणांची कमाई केली आणि गेमसह सामना जिंकला.

हेही वाचा >>>IND vs AUS 1st T20 : शेवटच्या बॉलवर सिक्स मारून सामना जिंकला, पण त्या धावा रिंकूला मिळाल्याच नाहीत, कारण…

अग्रमानांकित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्त्विक-चिराग जोडीने जपानच्या अकिरा कोगा व ताइची सेइतो जोडीला २१-१५, २१-१६ असे नमवले. भारतीय जोडीचा सामना आता इंडोनेशियाच्या लियो रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन जोडीशी होणार आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी जोडीला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही.