महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चीनच्या योंगली हिने सुवर्णपदक जिंकताना ११.२९ सेकंद वेळ नोंदविली. मात्र तिला ११.२४ सेकंद हा स्पर्धा विक्रम तोडता आला नाही. या शर्यतीत एकही भारतीय खेळाडू अंतिम फेरी गाठू शकली नव्हती. चिसातो फुकुशिमा (जपान) व ताओ युजिया (चीन) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.
पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत बिंगतियान याने १०.१७ सेकंद वेळ नोंदविली. त्याला ९.९९ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडता आला नाही. सॅम्युअल फ्रान्सिस (कतार) व बराकत अल हराथी (ओमान) हे अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
पुरुषांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा हजार मीटर्समध्ये रतीरामला कांस्यपदक मिळाले. त्याने ही शर्यत २९ मिनिटे ३५.४२ सेकंदात पार केली. बहारिनच्या अलेमु गेब्रे (२८ मिनिटे ४७.२६ सेकंद) व बिलिसुमा गेलीस (२८ मिनिटे ५८.६७ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविन कौतुकास्पद कामगिरी केली.
सौदी अरेबियाच्या युसूफ मसराही याने पुरुषांची चारशे मीटर मीटर धावण्याची शर्यत ४५.०८ सेकंदात जिंकली. बहारिनच्या अली खमीस याने रौप्यपदक मिळविले. त्याला हे अंतर पार करण्यास ४५.०५ सेकंद वेळ लागला. जपानच्या युझो कानेमेरु (४५.९५ सेकंद) याला कांस्यपदक मिळाले.

Story img Loader