दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच जर्मनीच्या पॉल ऑक्टोपसने विजेतेपदाचे अचूक भवितव्य वर्तवले होते. आता चीनमधील बेबी पांडा फिफा विश्वचषकाच्या सामन्यांचे अचूक भविष्य वर्तवण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन संघांचे झेंडे असलेल्या बास्केटमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार असून पांडा ज्या बास्केटमधील खाद्यपदार्थ निवडेल, तोच संघ विजेता ठरेल, असे या पांडाचे निदान असणार आहे.
पॉल ऑक्टोपसने ज्याप्रकारे लोकप्रियता मिळवली होती, त्याचप्रमाणे पांडा लोकप्रिय होईल, असा चीनला विश्वास आहे. साखळी सामन्यांसाठी तो विजय, पराभव किंवा बरोबरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन बांबूच्या बास्केटमधून खाद्यपदार्थ निवडेल. तर बाद फेरीच्या सामन्यांसाठी तो प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांचे झेंडे लावलेल्या फांद्यावर झोके घेणार आहे.

Story img Loader