India vs Australia: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये आपल्या बेंच स्ट्रेंथची टेस्ट घेतली आणि आतापर्यंतची योजना सकारात्मक असून भारतीय संघ त्यात पास झाला आहे. मात्र, आता संघ व्यवस्थापनाला प्लेईंग-११ मध्ये कोणाला निवडावे हे आव्हान पेलावे लागू शकते. पहिल्या दोन सामन्यात न खेळलेल्या खेळाडूंच्या जागी तिसर्‍या वन डेत कोण बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकेतेचे ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आदी बडे खेळाडू पहिल्या दोन सामन्यात खेळले नाहीत तर दुसऱ्या सामन्यात विश्रांती घेणारा जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. यावर के.एल. राहुलने सूचक विधान केले.

रोहित, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी चांगली कामगिरी केल्याने कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यासमोर सर्वोत्तम अंतिम संघ निवडणे ही मोठी समस्या असेल. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय

अय्यरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले दुसरीकडे, सूर्यकुमारने दोन्ही सामन्यात सलग दोन अर्धशतके ठोकली. आता कोहली आणि पांड्याच्या पुनरागमनाने संघ व्यवस्थापन अडचणीत आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या के.एल. राहुलला वाटते की, “प्लेईंग-११ निवडणे ही कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला राईट हॅण्ड बॅटिंग करणं पडलं महागात, अश्विनने दिला धोबीपछाड; पाहा Video

इंदोरमधील दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर के.एल. राहुल म्हणाला, “खेळाडू म्हणून हा आमचा निर्णय नाही. तो निर्णय घेण्याचा अधिकार कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा आहे. रोहित. विराट परतल्यावर अंतिम अकरामध्ये कोणाची निवड करावी, ही प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनासमोर मोठी डोकेदुखी असणार आहे. आपल्या जबाबदाऱ्या, भूमिका सर्वच खेळाडूंनी अगदी स्पष्ट केल्या आहेत. प्लेइंग-११ मध्ये निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मेहनत घ्यावी लागते आणि त्यांनी ती घेतली आहे. खूप धावा केल्यावर बाहेर बसवणे ही बाब कठीण असते, परंतु प्रत्येकाने ती अवघड परिस्थिती पार केली आहे. मला वाटते की हे नेहमीच असेच असते, यातून रोहितभाई नक्कीच योग्य मार्ग काढतील.”

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिल आणि अय्यर यांनी शतके झळकावली, तर के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांमुळे भारताला ५० षटकात ३९९/५ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. नाणेफेकीच्या वेळी, राहुलला प्रथम गोलंदाजी करायची होती आणि सामन्यानंतर त्याने सांगितले की उत्तरार्धात चेंडू जास्त फिरेल अशी अपेक्षा नव्हती. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी सहा विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.

हेही वाचा: Asian Games 2023: भर दो झोली…! एशियन गेम्समध्ये भारताने उघडला पदकाचा पंजा, पहिल्या दिवस नारी शक्तीच्या नावावर

राहुल पुढे म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा खेळपट्टी पाहिली तेव्हा मला वाटले नव्हते की, ती इतकी फिरकी घेईल. ४०० धावांचे लक्ष्य ठेवल्याने आत्मविश्वास येतो. आम्ही काही झेल सोडले, परंतु जेव्हा तुम्ही दर दुसर्‍या दिवशी एवढा लांब प्रवास करता आणि वेगळ्या मैदानावर खेळता तेव्हा तुम्हाला लाइट्सची सवय नसते. शारीरिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असतात. बरेच लोक बऱ्याच काळापासून खेळत आहेत. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रशिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कधी कधी या चुका होतात. वचनबद्धता नेहमीच असते, आम्ही त्यातून शिकू, त्यावर मात करू आणि पुढील सामन्यात अधिक चांगले क्षेत्ररक्षण करू.”

Story img Loader